साखळीत प्लास्टिक विरोधात मोहीम; विक्रेत्यांविरुद्ध दंडात्मक कारवाई

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 16 सप्टेंबर 2020

सोमवारी साप्ताहिक बाजाराच्या दिवशी प्लास्टिकच्या पिशव्या वापरणाऱ्या बाजारातील फळ-भाजी आदी विक्रेत्यांविरोधात पालिकेच्या अधिकाऱ्यांनी कारवाई करताना विक्रेत्यांना नियमानुसार दंड ठोठावला. मागील साप्ताहिक बाजाराच्या दिवशीही अशीच कारवाई करण्यात आली होती. 

डिचोली: साखळी बाजारातील प्लास्टिक पिशव्या वापरावर नियंत्रण आणि शहर प्लास्टिकमुक्‍त करण्यासाठी पालिकेतर्फे प्लास्टिकविरोधी मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत ‘सिंगल यूज’ प्लास्टिकच्या पिशव्या वापरणाऱ्या विक्रेत्यांविरुद्ध पालिकेने दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. 

पालिकेचे मुख्याधिकारी प्रवीणजय पंडित यांच्या निर्देशानुसार ही कारवाई हाती घेण्यात आली आहे. काल सोमवारी साप्ताहिक बाजाराच्या दिवशी प्लास्टिकच्या पिशव्या वापरणाऱ्या बाजारातील फळ-भाजी आदी विक्रेत्यांविरोधात पालिकेच्या अधिकाऱ्यांनी कारवाई करताना विक्रेत्यांना नियमानुसार दंड ठोठावला. मागील साप्ताहिक बाजाराच्या दिवशीही अशीच कारवाई करण्यात आली होती. 

प्लास्टिक पिशव्या वापरण्यावर बंदी असतानादेखील बाजारातील काही विक्रेते ग्राहकांना देण्यासाठी सर्रासपणे ‘सिंगल यूज’ प्लास्टिकच्या पिशव्या वापर करतात. असे आढळून येत आहे. यापुढेही ही कारवाई चालूच राहणार असल्याचे समजते.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या