राज्यातील कोरोना स्थिती हाताबाहेर; आमदार विजय सरदेसाई यांची सरकारवर टीका

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 26 सप्टेंबर 2020

कोरोना संसर्गाची स्थिती दिवसेंदिवस बिकट होण्यामागे राज्य सरकारचे गैरव्यवस्थापन, प्राधान्यक्रम देताना होत असलेल्या चुका तसेच या महामारीसाठी सरकारने न केलेली पूर्वतयारी याला जबाबदार आहे. याविरुद्ध लढण्यासाठी सरकारेच योग्य नियोजन नसल्याने ही स्थिती उद्‍भवली आहे, असे ते म्हणाले. 

पणजी: राज्यात दरदिवशी संशय असलेल्या कोरोना संसर्ग रुग्णांच्या चाचण्या केल्या जातात. त्यातील सुमारे एक तृतियांश जण कोरोना संसर्ग रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोना संसर्ग रुग्ण व कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण दशलक्षमागे देशात सर्वाधिक आहे. यावरून राज्यातील कोरोना स्थिती हाताबाहेर गेली आहे, अशी टीका गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी केली. 

कोरोना संसर्गाची स्थिती दिवसेंदिवस बिकट होण्यामागे राज्य सरकारचे गैरव्यवस्थापन, प्राधान्यक्रम देताना होत असलेल्या चुका तसेच या महामारीसाठी सरकारने न केलेली पूर्वतयारी याला जबाबदार आहे. ही महामारी सरकारने सुरवातीपासूनच गंभीरतेने घेतली नाही व ती जेव्हा हाताबाहेर जात असल्याचे दिसून आल्यावर निर्णय घेण्यास उशीर झाला. याविरुद्ध लढण्यासाठी सरकारेच योग्य नियोजन नसल्याने ही स्थिती उद्‍भवली आहे, असे ते म्हणाले. 

राज्यातील रस्त्यांच्या स्थितीबाबत बोलताना आमदार सरदेसाई म्हणाले, की गोव्यातील रस्ते हे ‘डायरेक्ट चंद्रार’ गेल्यासारखे वाटत आहेत. प्रत्येक रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. हे खड्डे बुजविण्यासाठी सरकारकडे निधी नाही. मात्र, सार्वजनिक बाधकाममंत्री दीपक पावस्कर यांच्या बंगल्याच्या नुतनीकरणासाठी खर्च करण्यास निधी आहे. यावरून सरकारला लोकांच्या हिताचे काहीच पडलेले नाही, तर त्यांचे लक्ष आरामदायीकडे आहे. वाहनचालक हे सरकारला रस्ता कर भरतात. त्यांना चांगले रस्ते देण्याकडे सरकारला वाटत नाही. मात्र, मंत्र्यांवर खर्च करण्यास त्यांच्याकडे पैसे आहेत. हे गोरगरीब व सर्वसामान्यांचे सरकार नसून ते स्वतःचे फायदे करून घेणारे सरकार आहे, अशी टीका त्यांनी केली.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या