गोएंचो एकवोटने सशस्त्र रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांसह सर्वेक्षणाचे काम पाडले बंद

जमिनीवर (Lands) अतिक्रमण केले परंतु गरज पडल्यास त्यांच्या रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत त्यांच्या वडिलोपार्जित जमिनीचे रक्षण करण्याची शपथ घेणार्‍या ग्रामस्थांनी त्यांना हाकलून लावले.
गोएंचो एकवोटने सशस्त्र रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांसह सर्वेक्षणाचे काम पाडले बंद
मोल्लो पाली वेलसाव येथे रेल्वेने (Railways) चालवलेले अवैद्य सर्वेक्षण रोखताना ग्रामस्थ. या वेळी तेथे दाखल झालेले उपअधीक्षक राजू राऊत देसाई.Dainik Gomantak

दाबोळी: गोएंचो एकवोट यांनी मोल्लो, पाले-वेल्साव येथील ग्रामस्थांसह संध्याकाळी सशस्त्र रेल्वे (Railways) सुरक्षा दलाच्या जवानांसह आलेल्या रेल्वे कंत्राटदारांचे (RVNL) अवैध सर्वेक्षणाचे काम बंद पाडले. आरव्हीएनएलने सध्याच्या सिंगल ट्रॅकच्या बाजूने असलेल्या खाजगी जमिनीवर अतिक्रमण केले परंतु गरज पडल्यास त्यांच्या रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत त्यांच्या वडिलोपार्जित जमिनीचे रक्षण करण्याची शपथ घेणार्‍या ग्रामस्थांनी त्यांना हाकलून लावले.

मोल्लो पाली वेलसाव येथे रेल्वेने (Railways) चालवलेले अवैद्य सर्वेक्षण रोखताना ग्रामस्थ. या वेळी तेथे दाखल झालेले उपअधीक्षक राजू राऊत देसाई.
Goa: मंत्रीमंडळाच्या 'या' निर्णयाविरोधात 'गोएंचो एकवॉट' संघटनेचा निषेध

संपूर्ण गोव्याबरोबर मुरगाव तालुक्यात मोल्लो, पाले वेलसाव येथील रेल्वे दुपदरी करण्याच्या कामाला येथील ग्रामस्थांकडून कडवा प्रतिकार होत असून गरज पडल्यास रक्ताच्या शेवटच्या थेम्बापर्यंत त्यांच्या वडीलोपार्जीत जमिनीचे रक्षण करण्यासाठी शपथ येथील ग्रामस्थांनी घेतली आहे. मोल्लो, पाली येथे रेल्वे कंत्राटदार अवैद्य सर्वेक्षण करून खाजगी जमिनीवर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न चालवला आहे. येथील ग्रामस्थांचा विरोध असतानाही रेल्वेतर्फे याठिकाणी जमिनीचे सर्वेक्षण करण्यासाठी रेल्वे कंत्राटदार पाठवतात. मात्र येथील जागरूक नागरिक या कंत्राटदारांना हाकलून लावतात. मात्र ग्रामस्थांच्या या रोषाला न जुमानता रेल्वे पुन्हा पुन्हा आपल्या कंत्राटदारांना पाठवून येथील ग्रामस्थांची छळवणूक करतात.

मोल्लो पाली वेलसाव येथे रेल्वेने (Railways) चालवलेले अवैद्य सर्वेक्षण रोखताना ग्रामस्थ. या वेळी तेथे दाखल झालेले उपअधीक्षक राजू राऊत देसाई.
भाजपला पराभूत करण्याचे गोव्यातील लोकांचे एकच ध्येय

दरम्यान आज संध्याकाळी नियोजित जागेवर आरव्हीएनएलचे रेल्वे कंत्राटदार अवैध सर्वेक्षणाचे काम करताना ग्रामस्थांनी बंद पाडले. या वेळी रेल्वेने सशस्त्र रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांचा उपयोग केला. रेल्वे पोलिसांना बघून ग्रामस्थांचा पारा अधिकच चढला व त्यांनी वडिलोपार्जित जमिनीवर रेल्वे ने आपला हक्क दाखवल्यास आपण गप्प बसणार नाही. रस्त्याच्या शेवटच्या थेम्बापर्यंत वडीलोपार्जीत जमिनीचे रक्षण करण्याची शपथ या वेळी ग्रामस्थांनी घेतली. दरम्यान प्रकरण वाढत असल्याने तेथे मुरगाव तालुका उपअधीक्षक राजू राऊत देसाई यांच्यासह पोलिस दलाचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला व त्यांनी ग्रामस्थांना नियंत्रणात आणले. यावेळी ग्रामस्थांनी रेल्वे कंत्राटदाराला नाकीनऊ आणले. उपअधीक्षक राजू राऊत देसाई यांनीही रेल्वे कंत्राटदाराला समजावून तेथून जाण्याचे फर्मान सोडले. या गावात परत पाय ठेवल्यास खबरदार असा इशारा यावेळी ग्रामस्थांनी रेल्वे कंत्राटदाराला दिला. यावेळी ग्रामस्थांच्या मदतीला गोंयचो एकवट संघटना धावून आली.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com