या विकेन्डला गोव्याला जाताय? जाणून घ्या विमानांचे वधारलेले दर

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 11 फेब्रुवारी 2021

उद्यापासून सुरू होणाऱ्या गोवा कार्निवलच्या पार्श्वभूमीवर शनिवार व रविवारच्या गोव्यात येणाऱ्या विमानांच्या किंमती तब्बल चार पटीने वाढल्या आहेत.

पणजी : उद्यापासून सुरू होणाऱ्या गोवा कार्निवलच्या पार्श्वभूमीवर शनिवार व रविवारच्या गोव्यात येणाऱ्या विमानांच्या किंमती तब्बल चार पटीने वाढल्या आहेत. तसेच, गोव्याबाहेर जाणाऱ्या विमानांच्या किंमतीदेखील वाढल्या आहेत.साधारणत: पुण्याहून गोव्याला जाणाऱ्या विमानाच्या तिकिटाची किंमत 3,000 रूपये असते.

गोवा कार्निव्हल : या फ्लाईट्समध्ये घेता येणार खास गोवन जेवणाचा आस्वाद

परंतु, येणाऱ्या विकेन्डच्या पुण्याहून गोव्याला जाणाऱ्या विमानाच्या तिकिटांची किंमत ही 10,500 रूपयांच्या पुढे गेली आहे. येत्या सोमवारी गोव्याहून पुण्याला विमानानने जाण्यासाठी 11,500 रूपये मोजावे लागतील. शुक्रवारी व शनिवारी हैदराबादहून गोव्याला यायच्या तिकिटाची किंमत 8,200 रुपये आहे, जी साधारणत: 3,000 रूपयांच्या आसपास असते. 

गोव्यातील शहरेही ’स्वयंपूर्ण’ करणार - मुख्यमंत्री प्रमोद सावंत

संबंधित बातम्या