गोव्यातून महाराष्ट्रामध्ये जाताय? RT-PCR चाचणी असेल बंधनकारक
RT-PCR compulsary.

गोव्यातून महाराष्ट्रामध्ये जाताय? RT-PCR चाचणी असेल बंधनकारक

गोव्यातून  येणाऱ्या सर्व प्रवाश्यांना महाराष्ट्रात प्रवेश मिळण्यासाठी कोरोना अहवाल निगेटिव्ह असणे  महाराष्ट्र सरकारने बंधनकारक केले आहे. महाराष्ट्रा सरकारचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी दिलेल्या आदेशात गोवा राज्याला संवेदनशील उत्पत्तीचे (सेंन्सिटिव्ह ओरिगिन)  ठिकाण घोषित करण्यात आले आहे. हा निर्णय इतर ठिकाणांहून कोरोना विषाणूच्या प्रकारांचा ओघ थांबविण्याच्या उद्देशाने घेतला आहे. राज्य सरकारने नवीन नियम जारी केले आहेत, त्यानुसार रेल्वेमधून प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांना  महाराष्ट्रात प्रवास  करण्याच्या 48 तासाच्या अगोदरचा  आरटी-पीसीआर चाचणी अहवाल सोबत असणे आवश्यक आहे. महाराष्ट्र सरकारने गोव्यातून येणाऱ्या प्रवाशांसाठी स्थायी कार्यप्रणाली (एसओपी) देखील जारी केल्या आहेत. (Going to Maharashtra from Goa? RT-PCR testing will be mandatory)

गोव्यातून येणाऱ्या प्रवेशासाठी कार्यप्रणाली (एसओपी)

गोव्यातून महाराष्ट्रमध्ये रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची माहिती रेल्वे  प्रशासनाने प्रवाशी उतरलेल्या स्थानकाजवळील स्थानिक आपत्ती    व्यवस्थापन अधिकाऱ्याला देणं बंधनकारक असणार आहे. 

1) रेल्वे निघण्याच्या 4 तास आधी प्रवाश्यांचा डेटा दररोज स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडे द्यावा लागेल.

2) गोव्यातून येणाऱ्या प्रवाशांना आरक्षित तिकिट दिली जाणार नाही. रेल्वेने   हे सुनिश्चित केले पाहिजे की संवेदनशील ठिकाणाहून येणाऱ्या गाड्या       बाह्य प्लॅटफॉर्मवर आल्या पाहिजेत. जेणेकरून थर्मल स्क्रीनिंग (प्रवाशांचे)   करणे सोपे जाईल ,असे आदेशात म्हटले आहे.

3) प्रवाशाकडे जर आरटी पीसीआर अहवाल नसल्यास स्टेशनवर त्यांची जलद प्रतिजैविक चाचणी (रॅपिड अँटीजेन टेस्ट) घ्यावी लागेल, असेही यात नमूद केले आहे.

दरम्यान, महाराष्ट्रामध्ये कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. मागच्या चोवीस तासात महाराष्ट्रामध्ये 58,294 रुग्ण आढळले आहेत. 52,412 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. 24 तासात 351 रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. तसेच गोव्यामध्ये मागच्या 24 तासात 940 रुग्ण आढळले असून 428 रुग्णांनी कोरोनावरती मात केली आहे. गोव्यात 17 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com