Loutolim Robbery Video: ओ गॉड, ओ गॉड... महिला ओरडत राहिली पण, बाकावर बसलेल्या वृद्धेच्या हातातून चोरी केल्या सोन्याच्या बांगड्या

चॅपल समोर बाकावर बसलेल्या वृद्ध महिलेच्या हातातून सोन्याच्या बांगड्या दिवसाढवळ्या चोरी केल्याची घटना लोटली येथून समोर आली आहे.
Loutolim Robbery Video
Loutolim Robbery VideoDainik Gomantak

Loutolim Robbery Video: चॅपल समोर बाकावर बसलेल्या वृद्ध महिलेच्या हातातून सोन्याच्या बांगड्या दिवसाढवळ्या चोरी केल्याची घटना लोटली येथून समोर आली आहे.

वृद्ध महिला ओ गॉड, ओ गॉड... अशी मदतीसाठी ओरडत राहिली पण तिच्या मदतीला कोणीही आले नाही. अखेर दोन चोरट्यांनी जबरदस्तीने तिच्या हातातून सोन्याच्या बांगड्या काढून घेतल्या आणि बाईकवर बसून फरार झाले.

लोटली येथील या घटनेचा व्हिडिओ सध्या समोर आला असून, एक वृद्ध महिला गावाबाहेर असलेल्या चॅपलजवळ असलेल्या एका बाकावर बसलेली दिसत आहे.

महिला एकटीच असून, सभोवताली कोणीच दिसत नाही. दरम्यान, दोन तरूण त्याठिकाणी येतात व महिलेच्या हातातील सोन्याच्या बांगड्या जबरदस्तीने काढू लागतात. यावेळी महिला ओ गॉड, ओ गॉड... अशी मदतीसाठी ओरडताना व्हिडिओमधून ऐकू येत आहे.

मदतीला हाक मारली तरी कोणीच महिलेच्या मदतीला येत नाही, दरम्यान, दुसरा एक तरूण त्याठिकाणी दुचाकी घेऊन येतो आणि तिघेही दुचाकीवरून पोबारा करतात.

Loutolim Robbery Video
Traffic Jam: एकीकडे रस्त्याचे काम दुसरीकडे कंटेनरवर कोसळले झाड, काणकोण-मडगाव मार्गावर वाहतूक कोंडी

दरम्यान, महिला मदतीसाठी ओरडत असताना आजुबाजूला कोणीच तिच्या मदतीला येत नाही. घटना घडत असताना एक दुचाकी चालक देखील रस्त्याने जाताना दिसत असून, तो देखील तिच्या मदतीसाठी थांबत नाही.

मात्र, चोरट्यांनी वृद्ध महिला एकटी असल्याची संधी साधत तिच्या हातातून सोन्याच्या बांगड्या काढून पळून जाण्यास यशस्वी होतात.

याप्रकरणी गुन्हा दाखल झाला की नाही याबाबत अद्याप माहिती मिळू शकली नाही. तसेच, महिलेचे नाव आणि एकूण किती रूपये किमतीच्या बांगड्यांची चोरी झाली याची माहिती मिळाली नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com