केप्यात दिवसाढवळ्या सोनसाखळी लंपास

सोनसाखळी चोरट्यांनी काही दिवसांपूर्वी राज्यात धुमाकूळ घातला होता. आता असे प्रकार केपेतही घडत असल्याने लोकांमध्ये भीती निर्माण झाली आहे.
केप्यात दिवसाढवळ्या सोनसाखळी लंपास
Goa Crime NewsDainik Gomantak

केपे : सोनसाखळी चोरट्यांनी काही दिवसांपूर्वी राज्यात धुमाकूळ घातला होता. आता असे प्रकार केपेतही घडत असल्याने लोकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. आज (शनिवारी) सकाळी मुलांना शाळेत सोडून परत येताना झरीवाडा केपे येथील एका महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी खेचून पळवून नेल्याने या भागातील लोकांनी भीती व्यक्त केली आहे.

Goa Crime News
आंतरराष्ट्रीय योग दिन ऐतिहासिक स्थळावर : श्रीपाद नाईक

मिळालेल्या माहितीनुसार, झरीवाडा येथील एक महिला आपल्या मुलांना केपे येथील शाळेत सोडून परत आपल्या दुचाकीने घरी येत होती. या वेळी महिलेच्या दुचाकीचा संशयित चोरट्यांनी पाठलाग केला. महिला घराकडे निघाली असता बेतमड्डी येथे ती पोहचली असता पाठीमागून दुचाकीवरून येणाऱ्या दोघा संशयित चोरट्यांपैकी एकाने महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी खेचून पळ काढला. हा प्रकार दिवसाढवळ्या घडल्याने परिसरात दिवसभरात भीती होती.

नंबर प्लेट नसलेली वाहने रस्त्यावर

केपे भागात अनेक दुचाकीस्वार वेगाने आपली वाहने हाकताना सर्रासपणे दिसत आहेत. रस्त्यावर पोलीस दिसले की आपले वाहन वळवून पोलिसांना चकवा देऊन धूम ठोकण्याचे प्रकार बरेच वाढले आहेत.

यात बऱ्याच दुचाकीला नंबर प्लेट नसल्याचे दिसून आले आहे. या दुचाकीस्वारावर वेळीच कडक कारवाई न केल्यास बेकायदेशीर कृत्ये अशीच वाढत राहणार असल्याचे लोकांचे म्हणणे होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com