मडगाव बाजारपेठेत सुरक्षेसाठी गोल्ड डिलर्सचे सहकार्याने पोलिसांना सुरक्षा बुथ

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 10 सप्टेंबर 2020

असोसिएशनचे पदाधिकारी येत्या काही दिवसांत पोलिस अधिकाऱ्यांची भेट घेऊन मडगाव मार्केटमधील सुरक्षा यंत्रणा बळकट करण्याच्या संदर्भात प्रस्ताव सादर करणार आहेत, अशी माहिती गोवा गोल्ड डिलर्स असोसिएशनचे अध्यक्ष प्रमित रायकर यांनी दिली.

मडगाव: मडगावच्या मध्यवर्ती भागातील बाजारपेठेच्या सुरक्षेसाठी पुरेशी सुरक्षा यंत्रणा उभारण्यासाठी पोलिसांना आवश्यक ती पायाभूत सुविधा पुरवण्याची तयारी गोवा गोल्ड डिलर्स असोसिएशनने दाखवली आहे. 

असोसिएशनचे पदाधिकारी येत्या काही दिवसांत पोलिस अधिकाऱ्यांची भेट घेऊन मडगाव मार्केटमधील सुरक्षा यंत्रणा बळकट करण्याच्या संदर्भात प्रस्ताव सादर करणार आहेत, अशी माहिती गोवा गोल्ड डिलर्स असोसिएशनचे अध्यक्ष प्रमित रायकर यांनी दिली. असोसिएशनतर्फे एक सुरक्षा बुथ आधीच पोलिसांना देण्यात आला आहे. मडगाव पालिका इमारतीजवळच्या चौकात हा बूथ बसवण्यात आला आहे, अशा प्रकारचे आणखी दोन बूथ पोलिसांना देण्याचा प्रस्ताव आहे

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या