दुबईहून गोव्यात आलेल्या प्रवाशाकडून 17.39 लाखांचे सोने जप्त

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 23 मार्च 2021

दुबईहून एअर इंडियाच्या विमानाने दाबोळी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरलेल्या एका प्रवाशाकडून सीमा शुल्कच्या गोवा विभागाने 17 लाख 39 हजार रुपयांचे सोने सोमवारी जप्त केले.

दाबोळी: दुबईहून एअर इंडियाच्या विमानाने दाबोळी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरलेल्या एका प्रवाशाकडून सीमा शुल्कच्या गोवा विभागाने 17 लाख 39 हजार रुपयांचे सोने सोमवारी जप्त केले. 432 ग्रॅम वजनाच्या सोन्याचा लगादा करून त्याचे तीन कॅप्सुल्स तयार करून ते आपल्या शरीरामध्ये लपविले होते. तथापी तेथे गस्तीवर असलेल्या सीमा शुल्कच्या नजरेतून तो सुटू शकला नाही. त्याच्या एकंदर वागणुकीवरून तेथील अधिकाऱ्यांना संशय आल्याने तो तावडीत सापडला. 

Goa Election Result 2021: सत्ताधारी भाजपच्या गटात आत्मविश्वास निर्माण करणारा आणि विरोधकांना चिंतेत टाकणारा निकाल 

सीमा शुल्क कायद्याच्या 1962 च्या तरतुदीनुसार हे सोने जप्त करण्यात आले. ही कारवाई सीमा शुल्कच्या सहाय्यक आयुक्त (विमानतळ) ज्युलिएट फर्नांडिस व संयुक्त आयुक्त एम. एस. मीना तसेच आयुक्त मिहिर रंजन यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सीमा शुल्क गोवा विभागाने वीस मार्चला सुमारे 33 लाखाचे सोने दुबईहून आलेल्या प्रवाशांकडून जप्त केले होते. दोन दिवसांत सीमा शुल्कच्या अधिकाऱ्यांनी सव्वा किलो सोने जप्त केले. या सोन्याची किंमत सुमारे साडेपन्नास लाख रुपये होते.

गोव्यात येणाऱ्या पर्यटकांना कोविड-19 चाचणीचे नकारात्मक प्रमाणपत्रे द्यावे लागतील? 

संबंधित बातम्या