निवडणूक आयोगाच्या माध्यमातून गोव्यातील नवीन मतदारांना सुवर्णसंधी

Golden opportunity for new voters in Goa through Election Commission
Golden opportunity for new voters in Goa through Election Commission

सांगे: नवं मतदारांत जागृती करण्यासाठी आज सांगे शहरात उपजिल्हा अजय गावडे यांनी मतदान प्रक्रिये साठी झटणाऱ्या मतदान केंद्र प्रमुख (बीएलओ) यांना आज जागृती फेरीचा शुभारंभ केला. यावेळी मतदान केंद्र प्रमुख व इतर अधिकारी हजर होते. 

या प्रसंगी उपजिल्हाधिकारी अजय गावडे म्हणाले की निवडणूक आयोगाच्या माध्यमातून राज्यात नवीन मतदारांना सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यासाठी खास मोहीम राभविली जात असुन त्याचाच एक भाग म्हणून आज सर्व बीएलओ एकत्र येऊन शहरात जागृती फेरीचा शुभारंभ करण्यात आला आहे. खास करून या जागृती मोहिमेतून एक जानेवारी २०२१ रोजी ज्यांचे वय अठरा वर्षे पूर्ण होणार त्यांना सुद्धा या मतदार नोंदणी मोहिमेत सहभागी होऊन आपले नाव नोंदविता येईल. ही मोहीम पंधरा डिसेंबरपर्यंत चालणार असली तरी एक जानेवारीला  वयाची अठरा वर्षे पूर्ण होणार त्यांना ही संधी आहे त्याचा फायदा नवीन मतदारांनी करून घेण्याचे आवाहन करण्यात आले. 


मोहीम संपे पर्यंत प्रत्येक शनिवार, रविवार बीएलओ आपल्या मतदान केंद्रात बसून मतदारांकडून अर्ज स्वीकारणार आहे. ज्यांना आपले नाव नोंदणी करायचे आहे, किव्हा आपल्या घरातील मृत व्यक्तीचे नाव रद्द करायचे असल्यास, नाव आडनाव, किव्हा पत्ता दुरुस्ती असल्यास, शिवाय आपले नाव दुसऱ्या प्रभागात बदलायचे असल्यास किव्हा दुसऱ्या मतदान केंद्रात नोंदणी करायचे असल्यास प्रत्येक बीएलओ कडे विविध नमुन्याचे अर्ज उपलब्ध असेल. त्या केंद्रात जाऊन तेथील बीएलओ ना भेटून आपल्या अडचणी सादर कराव्यात. प्रत्येक नागरिकाला योग्य ते मार्गदर्शन व सहकार्य बीएलओ कडून देण्यात येणार आहे. 


याशिवाय ऑनलाईन किव्हा प्लेस्टोर वर आपले नाव नोंदविता येईल. किंवा उपजिल्हाधिकारी, मामलेदार या कार्यालयात नाव नोंदणी करण्यासाठी अर्ज उपलब्ध करण्यात आले आहे. मतदान हा पवित्र हक्क असुन आपला हक्क कायम राखण्यासाठी आपले नाव मतदारयादीत आहे की नाही याचीही माहिती जाणून घेण्याचे आवाहन उपजिल्हाधिकारी अजय गावडे यांनी केले आहे. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com