Panaji News : सांघिकतेने आव्हानांवर मात शक्य

प्रतापराव पवार : ‘गोमन्तक’च्या वर्धापनदिनी दीर्घ सेवा देणाऱ्या सहकाऱ्यांचा सन्मान
gomanatak anniversary
gomanatak anniversarydainik gomantak

Panaji News : ‘जागतिकीकरणाच्‍या रेट्यात माध्‍यमांमध्‍ये आमूलाग्र बदल होत असून, नवीन आव्‍हानेही निर्माण होत आहेत. परंतु तंत्रज्ञानाचा अंगीकार व सांघिक बळ असेल तर कोणतेही संकट भेदणे शक्‍य आहे ’, असा विश्वास सकाळ माध्यम समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार यांनी येथे केले.

‘गोमन्तक’च्या वर्धापनदिनी रौप्‍य महोत्सवी वाटचाल करणाऱ्या पत्रकारांचा सन्मान पवार यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

‘गोमन्तकने गोव्‍यातील सामाजिक उत्‍थानात महत्त्‍वाचे योगदान दिले आहे. ६१ वर्षांचा हा प्रदीर्घ काळ असून तो पूर्ण केल्याचा आम्हाला आनंद आहे. सर्वांच्या योगदानामुळेच ही वाटचाल सुकर झाली’, असेही पवार यांनी सांगितले.

यावेळी व्यासपीठावर सकाळचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी उदय जाधव, सकाळ समूहाचे संपादक-संचालक श्रीराम पवार, ‘गोमन्तक’चे संपादक-संचालक राजू नायक, ‘गोमन्तक’चे मुख्य व्यवस्थापक (व्यवसाय प्रशासन) सचिन पोवार उपस्थित होते.

gomanatak anniversary
Goa Petrol-Diesel Price: गोव्यात लॉंग ड्राईव्हला जायचंय? टाकी फुल्ल करण्याआधी वाचा पेट्रोल-डिझेलचे दर

श्रीराम पवार म्हणाले, ‘आपल्या मूल्यांशी तडजोड न करता धैर्यवादी वृत्ती आणि व्यवहार यात समन्वय साधत निश्‍चितपणे उत्तम वाटचाल करता येते. पत्रकारितेत नव्या संकल्पना येत आहेत. ज्यांना लिहिता येत नाही, अशा व्‍यक्‍तीही डिजिटल पत्रकारितेत पाहावयास मिळतात.

तंत्रज्ञानाच्या जोरावर ते नावीन्यपूर्ण ‘कॉन्‍टेन्‍ट’ देत आहेत. तंत्रज्ञानाद्वारे होत असलेले बदल समजून घेऊन आपणही नव्या संकल्पना अमलात आणाव्‍यात’. सूत्रसंचालन नीलेश करंदीकर यांनी केले. कार्यक्रमाच्‍या यशस्‍वीतेसाठी मनस्‍विनी प्रभुणे नायक व अलिशा नाईक,मनीषा घांटकर यांनी योगदान दिले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com