गोव्यातील स्वाभिमानी शिवप्रेमींच्या सहयोगाने भव्य मिरवणूकीचे आयोजन

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 31 मार्च 2021

गोव्यातील स्वाभिमानी शिवप्रेमींच्या सहयोगाने स्थापन केलेल्या गोमंतक छत्रपती शिवाजी महाराज शिवप्रेमी संघटनेच्या वतीने आज बुधवार 31 मार्च रोजी म्हापसा ते कळंगूटपर्यंत वाहनांची भव्य मिरवणूक आयोजित केली आहे.

म्हापसा : गोव्यातील स्वाभिमानी शिवप्रेमींच्या सहयोगाने स्थापन केलेल्या गोमंतक छत्रपती शिवाजी महाराज शिवप्रेमी संघटनेच्या वतीने आज बुधवार 31 मार्च रोजी म्हापसा ते कळंगूटपर्यंत वाहनांची भव्य मिरवणूक आयोजित केली आहे.

स्वाभिमानी शिवप्रेमींच्या संयोजनाखाली ही मिरवणूक होत असून, त्यामिमित्ताने कोविडसंदर्भात शासकीय नियमांचे पालन केले जाईल. शिवप्रेमींचे एकत्रीकरण होणार नाही आणि 144 कलमाचा भंगही केला जाणार नाही, अशी माहिती आयोजकांच्या वतीने बोलताना विश्वेश प्रभू यांनी दिली. या मिरवणुकीत किमान सुमारे शिवप्रेमी सहभागी होतील, असेही ते म्हणाले.

सर्व शिवप्रेमी भगवे फेटे परिधान करून दुपारी 3.30 वाजता म्हापसा येथील श्री बोडगेश्वर मंदिराच्या परिसरात एकत्रित होणार आहेत. त्यानंतर म्हापसा येथील हुतात्मा चौकातील छत्रपतींच्या पुतळ्याला पुष्पांजली अर्पण करून मिरवणुकीला दुपारी 4 वाजता प्रारंभ होणार आहे. ही मिरवणूक साळगावमार्गे कळंगूटपर्यंत जाणार आहे. त्यात दुचाकी वाहने व चार-चाकी वाहनांचा समावेश असेल. कळंगूटमध्ये स्थानिक शिवप्रेमींकडून मूर्तिपूजा झाल्यानंतर मिरवणूक हडफडेमार्गे मार्गक्रमण करणारन असून तीचा समारोप म्हापसा येथील श्री बोडगेश्वर मंदिराच्या परिसरात होणार आहे. यानिमित्ताने इतिहासाचे अभ्यासक प्रजल साख्ररदांडे यांचे मार्गदर्शनपर विशेष भाषण होणार आहे.
या मिरवणुकीत वाळपई, साखळी, डिचोली, म्हापसा, कळंगूट, पणजी, फोंडा, उसगाव, मांद्रे, काणकोण वास्को, मडगाव, सावर्डे, सांगे इत्यादी भागांतील शिवप्रेमी सहभागी होतील. सत्तरी येथील वाळपई शिवप्रेमी संघटना, सत्तरी जागृत युवा मंच, सत्तरी सांस्कृतिक संवर्धन समिती, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सत्तरी विभाग, भारत माता की जय सत्तरी विभाग यांचे विशेष सहकार्य या मिरवणुकीला लाभले आहे.

गोवा: 21 जूनपासून नवे शैक्षणिक वर्ष 

या निमित्ताने छोटेखानी मिरवणुका निघतील. वाळपई येथून दुपारी 1. 45 वाजता, साखळी रवींद्र भावन परिसरातून दुपारी 2 वाजता, डिचोली बसस्थानकावरून दुपारी 2. 30  वाजता मिरवणुका निघणार असून ती दुपारी 3. 45 वाजता म्हापसा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या ठिकाणी त्या पोहोचणार आहेत. तसेच पणजी येथील श्री महालक्ष्मी मंदिराच्याजवळून दुपारी 3 वाजता, हरमल येथून दुपारी 2 वाजता, मोरजी येथून दुपारी 3. 30  वाजता, उसगाव-तिस्क येथून दुपारी 2 वाजता, फर्मागुडी-फोंडा येथून दुपारी 2 वाजता, वास्को येथील दामोदर मंदिराजवळून दुपारी 2 वाजता, थिवी रेल्वे स्थानक चौकाजवळून दुपारी 3 वाजता, आर्ले-मडगाव जंक्शन येथून दुपारी 2 वाजता, काणकोण येथून दुपारी 1 वाजता, तर पेडणे बाजार येथून दुपारी 2. 45 वाजता छोटेखानी मिरवणुका निघून म्हापसा येथे एकत्रित होतील.

टॅक्‍सींना डिजिटल मीटर; ‘बोले तैसा चाले’ 

संबंधित बातम्या