Gomantak Impact: बालभवन शिक्षकांना मिळाली 5 टक्के पगारवाढ

11 महिन्यांची थकबाकी देण्याची मागणी
Gomantak Impact: बालभवन शिक्षकांना मिळाली 5 टक्के पगारवाढ
Gomantak ImpactDainik Gomantak

पर्ये: गोव्यातील (Goa) बालभवन केंद्रांमध्ये विविध कलांचे प्रशिक्षण देणाऱ्या शिक्षकांना अखेर दरवर्षी होणारी 5 टक्के पगारवाढ देण्यात आली आहे. गेल्या दोन वर्षांपासून ही पगारवाढ स्‍थगित ठेवण्यात आली होती. पण यासंबंधी दै. ‘गोमन्‍तक’ने प्रथम आवाज उठवत विषय समोर आणला.

याचदरम्यान बालभवन शिक्षक संघटनेने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेऊन पगारवाढीची मागणी केली होती. शेवटी सरकारतर्फे ही पगारवाढ देण्यात आली. दरम्यान, यावर्षी या शिक्षकांना दोन वर्षांची म्‍हणजेच त्यांच्या पगारात १० टक्के वाढ झाली आहे. सरकारने ही पगारवाढ देताना मागील वर्षाच्या एका महिन्याची थकबाकी दिली पण उर्वरित 11 महिन्यांची दिली नसल्‍याने बालभवन शिक्षक संघटनेतर्फे नाराजी व्यक्त करण्‍यात आली आहे. ती देण्‍याची मागणी करण्‍यात आली.

Gomantak Impact
गोव्यातील बालभवन शिक्षकांची नोकरी कायम करा

नोकरीत कायम करण्याची मागणी पडून

या शिक्षकांची बालभवनच्या नोकरीत कायम करण्याची मागणी अजूनही पूर्ण झालेली नाही. गेल्या 20-25 वर्षांपासून यातील बरेच शिक्षक कंत्राटी पद्धतीवर काम करत आहेत. ते कंत्राटी कामगार असल्याने त्यांनी नोकरीतील सुविधांचा लाभ होत नाही. त्‍यांना कायम करण्‍याची मागणी होत आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com