'तनिष्का'च्या माध्यमातून गोव्यात उभारणार स्त्रीप्रतिष्ठेची गुढी

महिलांच्या उस्फुर्त प्रतिसादात वाळपईमध्ये दिमाखदार सोहळ्याचे आयोजन
Sakal Tanishka Inaguration
Sakal Tanishka Inaguration Dainik Gomantak

आठ वर्षांपूर्वी स्त्रीप्रतिष्ठेची गुढी उभारून तनिष्का व्यासपीठाची सुरुवात झाली आहे. या व्यासपीठाच्या माध्यमातून संघटित स्त्रीशक्तीने महाराष्ट्रात विविध स्वरूपाची मोठी कामे उभी केली आहे. या उस्फुर्त प्रतिसादानंतर यापूढे जात गोव्यातील महिलांसाठी  गोमंतकच्या  माध्यमातून 'तनिष्का व्यासपीठ'ची मुहूर्तमेढ रोवली जात आहे.

Woman's present During inauguration ceremony
Woman's present During inauguration ceremony Dainik Gomantak

'तनिष्काची मुहूर्तमेढ रोवणार हा कार्यक्रम आज 24 जुलै रोजी वाळपई येथे होत आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन सकाळ माध्यम समूहाचे व्यवस्थापकीय संचालकअभिजीत पवार यांच्या हस्ते होणार असून या कार्यक्रमास प्रसिद्ध अभिनेत्री श्रुती मराठे आणि अभिनेता गौरव घाटणेकर हे प्रमुख पाहुणे उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमास आज सकाळी वाळपईत आयोजित केला आहे. यात महिलांसाठी 'धालो आणि फुगडी' स्पर्धेचे ही आयोजन केले आहे. या स्पर्धेच्या अंतिम फेरीत निवड होणाऱ्या महिलांवर बक्षिसांची खैरात होणार आहे. हे बक्षीस वितरण प्रसिद्ध अभिनेत्री श्रुती मराठे आणि अभिनेता गौरव घाटणेकर यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमासाठी महिलांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत असून लहान मुलींपासून ते वयस्कर महिलापर्यंतच्या महिला या कार्यक्रमात सहभागी झाल्य़ा आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com