‘फॉर्मेलिन’मध्ये ‘एफडीए’ पास; प्रक्रियेत अस्पष्टता

गोव्यात जी मासळी येते ती एफडीएच्या तपासणी शिवाय विक्री केली जात नाही असा दावा मंत्री विश्‍वजीत राणे यांनी केला होता. यावर ही तपासणी खरेच केली जाते का याची खातरजमा करण्यासाठी ‘गोमन्तक’ने ‘स्टिंग ऑपरेशन’ राबवले.
Sting Operation Formalin Fish in Goa
Sting Operation Formalin Fish in GoaDainik Gomantak

मडगाव : गोव्यात जी मासळी येते ती एफडीएच्या तपासणी शिवाय विक्री केली जात नाही असा दावा मंत्री विश्‍वजीत राणे यांनी केला होता. यावर ही तपासणी खरेच केली जाते का याची खातरजमा करण्यासाठी ‘गोमन्तक’ने ‘स्टिंग ऑपरेशन’ राबवले. ‘गोमन्तक’च्या प्रतिनिधींनी गुरुवारी रात्री 12 वाजता पोळे (काणकोण) येथील चेकनाक्यावर पाहणी केली. यावेळी परराज्यातून येणाऱ्या वाहनातील माशांची तपासणी केली जाते हे जरी दिसून आले तरी त्यात पारदर्शकतेचा पूर्ण अभावही जाणवून आला.

‘गोमन्तक’ची टीम रात्री चेक नाक्यावरील ‘क्वालिटी कंट्रोल ऑफ इंडिया’ तर्फे चालविल्या जाणाऱ्या प्रयोगशाळेजवळ पोहोचली. त्यावेळी केरळमधून आलेल्या एका वाहनातील मासळीची तपासणी सुरू होती. या प्रयोगशाळेच्या दोन कर्मचाऱ्यांनी इन्सुलेटेड पद्धतीची गाडी खोलून आतील खोक्यापैकी काही खोक्यातील मासळीचे नमुने घेतले आणि चाचणीसाठी आत प्रयोगशाळेत नेले. या सर्व घडामोडीचे चित्रिकरण करताना तेथील कर्मचाऱ्यांनी अडवत माहिती देण्यास टाळाटाळ केली. प्रयोगशाळेत मासळीची तपासणी कशी केली जाते? तपासणीसाठी किती रोज किती गाड्या येतात? इत्यादी प्रश्‍नांची उत्तरे मात्र तेथील कर्मचाऱ्यांनी दिली नाही. दरम्यान, ही प्रयोगशाळा 24 तास चालू असते अशी माहिती जवळच्या आरटीओ नाक्यावरून मिळाली.

Sting Operation Formalin Fish in Goa
गोव्यात पावसाळी अधिवेशनाचे अखेर सूप वाजले

अधिकाऱ्यांच्या स्पष्टीकरणात तफावत

मंगळुरूहून आलेल्या मासळीपार्सलवर मडगाव रेल्वे स्थानकावर चाचणी होत नसल्याचे निर्दशनास आले. यावर कोकण रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी बबन घाटगे यांनी जेथून माल चढविला जातो, तिथेच चाचणी होत असल्याचे सांगतिले. तर रेल्वेतून येणारी पार्सले प्रयोगशाळेत आणली जातात. तेथे चाचणी करूनच मासळीची विक्री होते असे एफडीएच्या संचालक ज्योती सरदेसाई यांनी सांगितले.

प्रयोगशाळेत मासळीचे तापासणीसाठी नमुने घेतले जात होते. ते फक्त दाराजवळ असलेल्या बॉक्समधील माशांचेच होते आणि हे नमुने ‘ऍट रेंडम’ (कुठल्याही दोन तीन खोक्यातील माशांचे) पद्धतीने घेतले जात आल्याचेही दिसून आले. प्रतिनिधींसमोर तीन ते चार वाहनातील मासळी तपासण्यात आली. मात्र, आतमध्ये असलेल्या एकाही बॉक्समधील मासळी तपासण्यात आलेली दिसली नाही. याबद्दल त्यांना विचारले तर या कर्मचाऱ्यांनी काहीही माहिती दिली नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com