Gomantak Tanishka : निराधाराचा आधार बनली 'तनिष्का'

उद्धाटन सोहळ्याच्या निमित्ताने पर्ये, सत्तरी येथील निराधार महिला श्रीमती रुक्मिणी बाबी नाईक यांना तनिष्काच्य़ा माध्यमातून अर्थिक मदतीचा हात दिला.
Gomantak Tanishka Platform
Gomantak Tanishka Platform Dainik Gomantak

आज गोव्यात महिलांसाठी गोमंतकच्या माध्यमातून 'तनिष्का'ची मुहूर्तमेढ रोवली जात आहे. या व्यासपीठचा मुख्य उद्देश महिलांना त्यांच्या हक्काच स्थान मिळवून देणे हा आहे. या उद्देशानेच गोमतंक यापुढे महिलांना समाजात असलेले स्थान मिळवून देण्यासाठी तनिष्काच्या माध्यमातून प्रयत्नशील असणार आहे.

आज या उद्धाटन सोहळ्याच्या निमित्ताने पर्ये, सत्तरी येथील निराधार महिला श्रीमती रुक्मिणी बाबी नाईक यांना तनिष्काच्य़ा माध्यमातून अर्थिक मदतीचा हात देण्यात आला. या मदतीनंतरच्या आनंदअश्रूंनी खऱ्या अर्थाने तनिष्काची गोव्यात सुरुवात झाली आहे.

Gomantak Tanishka Platform
Helpline: सायबर क्राईम, ऑनलाईन फ्रॉड तक्रारीसाठी लवकरच गोवा पोलिसांची हेल्पलाईन

सविस्तर वृत्त असे की, रुक्मिणी बाबी नाईक (रा. पर्ये गुरववाडा पर्ये, सत्तरी) या निराधार महिलेला मदतीची गरज आहे. काही दिवसांपूर्वी गोमंकतमध्ये याबाबत वृत्त प्रसिद्ध झाले होते. यानंतर समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढे येत रुक्मिणी यांना मदतीचा हात देणार असल्याचे गोमतंककडे कळवल्यानंतर गोमतंकने याची दखल घेत मिळालेली मदत रुक्मिणी यांना आजच्या तनिष्काच्या उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी सकाळ माध्यम समुहाचे व्यवस्थापकीय संचालक अभिजीत पवार यांच्या हस्ते सुपर्द केली.

रुक्मिणी नाईक या सध्या पर्ये, सत्तरी येथे राहात असून यांची परिस्थिती अत्यंत हलाकीची आहे. त्या काही घरात धुणी - भांडी करुन आपला उदरनिर्वाह करत आहेत. गेली 17 वर्षे त्या झोपडीतच राहात आहेत.

8 वर्षांपूर्वी त्यांच्या पतीचे निधीन झाल्याने त्या एकट्याच राहतात. त्यांचे नातेवाईक असले तरी त्यांच्याकडे कोणीही नातेवाईक फिरकायला तयार नाही. यात सध्या राहात असलेली विनाभिंत्तींची झोपडी राहतात.

या झोपडीची अवस्था अशी आहे की, पावसाचे पाणी थेट त्यांच्या झोपडीत शिरते. ज्यामुळे त्यांना घरी निट बसताही येत नाही, अशी स्थिती आहे. तसेच ही झोपडी आता जीर्ण झाली असून ती कधी कोसळेल याची शाश्वती नाही.

मात्र रुक्मिणी यांना या झोपडीत राहील्या खेरीज पर्याय नाही. असे असले तरी या झोपडीत त्या सध्या दिवस काढत आहेत. त्यामुळे त्यांना आता गरज आहे ती म्हणजे डोक्यावर किमान भक्कम छत असण्याची. आज गोमतंकने मदत केली असली तरी समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढे येत त्यांना उभारी देण्याची गरज आहे. त्यामुळे समाजातील व्यक्तींनी त्यांना मदत करण्याचे आवाहन गोमंतकतर्फे करण्यात आले आहे. ज्यांना पुढे येऊन सढळ हाताने मदत करायची आहे त्यांनी गोमंतकशी संपर्क साधावा.

गरज आहे लोकप्रतिनीधींनी मदतीचा हात देण्याची

पर्ये मतदारसंघ हा गोवा विधानसभा 2022 च्या निवडणुकीत चांगलाच चर्चेत होता. एकमेकांना तगडी टक्कर देणारे लोकप्रतिनिधी ही याच मदतदार संघात आहेत. असे असले तरी अद्याप रुक्मिणी यांच्याकडे कोणीही फिरकलेले नाहीत.

तसेच स्थानिक पंचांनी याची दखल घेणे अपेक्षित होते. मात्र गेली कित्येक वर्षे कोणताही प्रतिनिधी रुक्मिणी यांच्याकडे फिरकलेला नाही. त्यामुळे आज गरज आहे ती लोकप्रतिनिंधींनी त्यांची दखल घेण्याची आणि रुक्मिणी यांना मदतीचा हात देण्याची.

राज्य सरकारकडे मदतीचे आवाहन

रुक्मिणीसारख्या निराधार महिलांची संख्या आज लक्षणीय आहे. मात्र त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी कोणीही नाही. म्हणून राज्य सरकारने अशा महिलांचा विचार करत समस्या सोडवण्यासाठी योजना आखण्याची खऱी गरज आहे. त्यामुळे राज्य सरकारने यावर गांभीर्याने विचार करत योग्य पावले उचलणे आवश्यक आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com