Gomantak Tanishka : चला बदल घडवू या...वडाचे झाड लावू या

उदंड प्रतिसाद : पर्यावरण दिवस आणि वटपौर्णिमेनिमित्त गोमन्तक- तनिष्का व्यासपीठाचा उपक्रम
Gomantak Tanishka
Gomantak TanishkaGomantak Digital Team

गोमन्तक-तनिष्का व्यासपीठाच्या माध्यमातून वटपौर्णिमा आणि जागतिक पर्यावरण दिवसाच्या निमित्ताने तनिष्का गटातील महिलांसाठी वडाचे झाड लावण्याचा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. या उपक्रमाला राज्यातून जोरदार प्रतिसाद मिळाला.

राज्यभरातील महिलांनी पारंपरिक पद्धतीने वटपौर्णिमेचा सण मोठ्या उत्साहाने साजरा केलाच; पण त्यासोबतच तनिष्का व्यासपीठाने आयोजित केलेल्या ‘चला बदल घडवू या’ या उपक्रमाअंतर्गत आपापल्या भागात वडाचे रोप लावून वटपौर्णिमेला एक वेगळा अर्थ प्राप्त करून दिला. आजही खूप ठिकाणी वडाच्या झाडाची फांदी तोडून आणून फांदीची पूजा केली जाते. सण साजरे करताना निसर्गाची हानी होऊ नये, महिलांच्या हातून नवे झाड लावले जावे, या उद्देशाने ‘चला बदल घडवू या’ या नावाने वडाचे रोप लावण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

Gomantak Tanishka
Food Safety Day: दूध, बटाटे अन् दह्यासोबत 'हे' पदार्थ खाल्यास होऊ शकतात 200 आजार, वेळीच व्हा सावध

तनिष्का व्यासपीठतर्फे आयोजित या उपक्रमात महिलांनी मोठ्या उत्साहाने भाग घेतला. तनिष्का गटात कार्यरत असलेल्या हरमल, पालये, मुळगाव, वास्को, मुरगाव, चिखली, सांगे, काणकोण या भागातील महिलांनी आपापल्या गावात वडाचे रोप लावून त्याची पूजा केली. दक्षिण गोव्यातील कार्यक्रमाचे संयोजन सुस्मिता कुमठेकर यांनी केले.

Gomantak Tanishka
Goa Schools Reopen: शाळेचा पहिला दिवस! किलबिलाट आणि गजबजाट; असह्य उकाड्यातही विद्यालये गजबजली

वनविभागाचे सहकार्य

सांगे वनविभागाच्या सहकार्याने वडाची रोपे तनिष्का गटांना देण्यात आली. वनविभाग रक्षक अशोक वेळीप यांनी या उपक्रमासाठी मुद्दाम वडाची रोपे तयार करून दिली. दरवर्षी पारंपरिक पद्धतीने वटपौर्णिमा साजरी केली जाते. पण सामाजिक जागृती करण्याचे काम तनिष्का गटातील महिलांनी वटपौर्णिमेच्या निमित्ताने केले आणि आपापल्या भागात बदल घडवून आणण्यात मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.

Gomantak Tanishka
Goa Petrol-Diesel Price: उत्तर गोवा, पणजीमध्ये दरवाढ, दक्षिण गोव्यात दर स्थिर; जाणून घ्या पेट्रोल-डिझेलच्या आजच्या किमती

वडाच्या झाडाची फांदी तोडून आपण निसर्गाचे नुकसान करीत आहोत. अशीच परिस्थिती राहिली तर भविष्यात कदाचित पुढच्या पिढीला फक्त चित्रातच वडाचे झाड बघायला मिळेल. ही परिस्थिती येऊ नये, म्हणून आज आम्ही तनिष्का गटांना वडाच्या झाडाची रोपे दिली आणि ती सार्वजनिक ठिकाणी लावून त्याचीच पूजा केली.

पूजा ठाकूर, उत्तर गोव्यातील तनिष्का गटांच्या संयोजक

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com