गोवा पर्यटक अंगाची लाहीलाही झाल्याने हैराण; आठ दिवसात तापमानाने गाठला उच्चांक

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 1 एप्रिल 2021

गेल्या आठ दिवसांपासून उष्म्याने गोमंतकीयांच्‍या अंगाची लाहीलाही झाली. परप्रांतीय पर्यटकांनी हैराण होऊन पर्यटन दौरे अर्ध्यावर सोडण्याचा विचार चालविला असतानाच आज पहाटे वातावरणात थोडा गारवा होता.

पणजी: गेल्या आठ दिवसांपासून उष्म्याने गोमंतकीयांच्‍या अंगाची लाहीलाही झाली. बुधवारी मात्र काही प्रमाणात दिलासा मिळाला. आज चक्क 25 अंश सेल्‍सियसपर्यंत पारा खाली उतरला होता. पण, पुढील काही दिवस तापमानात वाढ दिसेल, असे हवामान खात्याने म्हटले आहे. गेल्या आठ दिवसांपासून गोव्यातील तापमान 35 अंशापासून ते 36 अंश सेल्सियसपर्यंत पोहोचल्याने गोमंतकीय हैराण झाले होते.

परप्रांतीय पर्यटकांनी हैराण होऊन पर्यटन दौरे अर्ध्यावर सोडण्याचा विचार चालविला असतानाच आज पहाटे वातावरणात थोडा गारवा होता. पहाटे पणजीत पारा 25 अंशावर होता. 10वा.च्या सुमारास 32  तसेच 1 ते 3 वाजेपर्यंत 35 अंशावर होता. पण त्यानंतर पुन्हा पारा घसरून 29 अंशावर आला. या आठवड्यात पहिल्यांदाच तापमान घातल्याने लोकांनी सुस्कारा सोडला. किनारपट्टीच्या प्रदेशात सगळीकडेच आज तापमान घटले होते.

गोवा: कोविड प्रतिबंधक लस घेतल्यानंतर 48 तासांत युवकाचा मृत्यू;  ‘त्या’ युवकाचे शवविच्छेदन इन कॅमेरा

मुंबईत पहिल्यांदाच 27.6 अंश तापमानाची नोंद झाली. याबाबत ‘गोमन्‍तक’कडे बोलताना हवामान शास्त्रज्ञ एम. राहुल म्हणाले, राज्यात सगळीकडेच एकसारखे तापमान नाही, काही ठिकाणी ते नेहमीप्रमाणे होते. पुढील काही दिवस तापमान सरासरीपेक्षा अधिक असण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी. आठ दिवसांत पहिल्यांदाच पारा उतरला

संबंधित बातम्या