गोमंतकीय शिवभक्तांनी केली महादेवाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी

गोमंतकीय शिवभक्तांनी केली महादेवाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी
Gomantakiya Shiva devotees made a big crowd to pay obeisance to Lord Shiva

पणजी: साखळीतील हरवळे येथील श्री रुद्रेश्‍वर मंदीरात महाशिवरात्री निमित्त दर्शन घेण्यासाठी भाविकांच्या सकाळपासूनच रांगा लागल्या होत्या. यावेळी भाविक कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे सर्रास उल्लंघन करताना दिसून आले. यावेळी हरवळेतील श्री रुद्रेश्‍वर मंदीरात महाशिवरात्री निमित्त नंदीकाठी भाविक सामुहिक अभिषेक केला, तसंच महादेवाच्या लिंगावर दुध घालून अभिषेक करण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. 

डिचोलीतील नार्वे येथील श्री सप्तकोठेश्‍वर मंदिरातदेखील भाविकांची सकाळपासूनच मोठी गर्दी झाली आहे. मंदीरात यंदा कोविड महामारीमुळे लिंगावर अभिषेक व लिंगाचे गर्भकुडीत जाउन दर्शन घेण्यात बंदी केल्यामुळे भाविकानी मंदीरात सामुहिक अभिषेक करण्यात आले.

रामनाथ देवस्थानात महाशिवरात्रोत्सवाला प्रारंभ


रामनाथी - फोंडा येथील श्री रामनाथ देवस्थानच्या वार्षिक महाशिवरात्रोत्सवाला आज, बुधवार 10 मार्चपासून प्रारंभ झाला. सकाळी नवचंडी, हवन व रात्री 8:30 वा. पुराण वाचनानंतर श्री रामनाथ देवाच्या रौप्य सुखासनोत्सव, श्री कामाक्षी देवीचा रौप्य शिबिकोत्सव, सज्जारोहण, 10 वा. श्री रामनाथ पंचिष्टास भेट व मंगलाचरणाने पहिल्या दिवसाच्या उत्सवाची सांगता झाली.
येथील महाशिवरात्रोत्सव सोमवार 15 मार्चपर्यंत साजरा केला जाणार आहे. पुढील पाच दिवसात विविध धार्मिक विधी व सांस्कृतिक कार्यक्रम व नाट्यप्रयोगांचे आयोजन केले आहे. कोविड महामारीचे गांभिर्य लक्षात घेऊन देवस्थानची परंपरा जपण्यासाठी कार्यकारी मंडळाने कोविडचे सर्व नियम काटेकोरपणे पाळूनच हा उत्सव साजरा करण्याचे ठरविले असून अन्नसंतर्पणाची सेवा स्थगित करण्यात आली आहे.


पुढील पाच दिवसात सकाळी 5 वा.पासून विविध धार्मिक विधी होणार आहेत. 11 रोजी रात्री श्री रामनाथ देवाचा रौप्य शिबिकोत्सव व श्री कामाक्षी देवीचा अंबारी उत्सव व त्‍यानंतर दीपस्तंभ पूजा व रात्री 10:30 वा. पासून सहवेश नाट्यप्रवेश सादर केले जातील. तिसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी पहाटे 5 वा. श्री रामनाथ देवाचा रथोत्सव, श्री कामाक्षी देवीचा रौप्य शिबिकोत्सव तसेच सायं. 5 वा. श्री रामनाथ देवाचा मुख्य रथोत्सव व श्री कामाक्षी देवीचा सुवर्ण शिबिकोत्सव, नारळ ओवाळणी व रात्री 10:30 वा. संगीत मदनाची मंजिरी या नाटकाचा एक प्रवेश सादर केला जाईल.


शनिवारी सकाळी धार्मिक विधी, रामनाथ देवाचा व कामाक्षी देवीचा रौप्य व सुवर्ण शिबिकोत्सव व रात्री 10:30 वा. संगीत मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी सकाळपासुन रात्रीपर्यंत विविध धार्मिक विधीस, श्री शांतेरी, श्री रामनाथ, श्री कामाक्षी देवीचा रौप्य व सुवर्ण शिबिकोत्सव व रात्री 10:30 वा. संगीत मत्स्यगंधा नाटकातील एक प्रवेश सादर केला जाईल.
शेवटच्या दिवशी सकाळपासून धार्मिक विधी व रात्री 10:30वा. संगीत संशयकल्लोळ नाटकाचा प्रयोग व श्री रामनाथ चौकावर महाजनाच्या नृत्य गायनाने उत्सवाची सांगता होणार आहे. सोमवार 15 व मंगळवार 16 रोजी भाविकांना कौल प्रसाद दिला जाईल, असे समितीतर्फे कळविण्यात आले आहे.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com