रेल्वे दुपदरीकरणाला स्थगिती हा गोव्याच्या अस्मिता रक्षणकर्त्यांचा विजय - दिगंबर कामत

''गोव्याची अस्मिता, पर्यावरण, संस्कृती व वारसा जपण्यासाठी मी वचनबद्ध''
Digambar kamat
Digambar kamatDainik Gomantak

मडगाव : गोव्यातील रेल्वे दुपदरीकरणासंबधी केंद्रीय उच्चाधिकार समितीने सुचविलेल्या शिफारशी मान्य करून राष्ट्रीय वन्यजीव बोर्डाने दिलेली परवानगी रद्द करण्यचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा गोव्याच्या पर्यावरण, वन व वन्यजीवांच्या रक्षणांसाठी तसेच गोव्याची अस्मिता राखुन ठेवण्यासाठी लढणाऱ्या गोमंतकीयांचा विजय आहे. असे मडगावचे आमदार व माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी म्हटले आहे. (Gomantak's victory was to stop the two-lane railway )

"सेव्ह मोलेम फ्रॉम डिस्ट्रक्शन" व "ओन्ली गोल से नो टू कोल" या घोषणा घेवुन गोव्याचे रक्षण करण्यासाठी लढा दिला त्याचे हे फळ आहे. असे दिगंबर कामत यांनी सर्वोच्च न्यायालयाने रेल्वे दुपदरीकरणावर दिलेल्या निवाड्यावर प्रतिक्रीया देताना म्हटले आहे. पर्यावरण नष्ट करणाऱ्या तीन प्रकल्पांना विरोध करणाऱ्या बहुतेक आंदोलनात माझा सक्रिय सहभाग होता.

Digambar kamat
गोव्यात स्थानिक व्यावसायिकांना प्राधान्य देणार: माविन गुदिन्हो

दक्षिण पश्चिम रेल्वेच्या हुबळी येथिल मुख्यालयात प्रखर निदर्शने करुन आम्ही रेल्वेच्या सरव्यवस्थापकांना निवेदन देवुन रेल्वे दुपदरीकरण बंद करण्याची मागणी केली होती. याची आठवण दिगंबर कामत यांनी करुन दिली. गोमंतकीय जनतेसोबत चांदोर, वेळसांव, सांज जुझे एरीयल येथे रात्री आयोजित निदर्शने, मोले ते मुरगाव पदयात्रा, लोहिया मैदानावरील जाहिर सभा अशा अनेक उपक्रमांत सहभागी होऊन गोव्याचा विनाश करणारे प्रकल्प रद्द करण्याची मागणी आम्ही केली.

Digambar kamat
गोव्यात रेल्वे दुपदरीकरणाला NBWL ने दिलेली मान्यता सर्वोच्च न्यायालयाने केली रद्द

गोवा विधानसभेतही गोव्याची अस्मिता नष्ट करणारे प्रकल्प रद्द करण्यासाठी आम्ही सरकारवर सातत्याने दबाव आणला असे दिगंबर कामत म्हणाले. गोव्याची अस्मिता, पर्यावरण, संस्कृती व वारसा जपण्यासाठी मी वचनबद्ध असुन, गोव्याच्या जनतेचा आवाज बनुन कार्य चालुच ठेवणार आहे असे दिगंबर कामत यांनी म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com