‘गोमेकॉ’ हॉस्पीटलमध्ये 1 कोटी 40 लाख लिटर्स ऑक्सिजन प्रतिदिन वापरला जातो

गोमंन्तक वृत्तसेवा
बुधवार, 28 एप्रिल 2021

गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात कोविड वॉर्डमध्ये 383 कोरोना रुग्ण दाखल आहेत. त्यापैकी 232 रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. त्यामुळे सध्या प्रतिदिन फक्त ‘गोमेकॉ’ इस्पितळातील कोविड रुग्णांसाठी 1.20 कोटी लिटर्स ऑक्सिजनची आवश्‍यकता आहे.

पणजी : गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात कोविड वॉर्डमध्ये 383 कोरोना रुग्ण दाखल आहेत. त्यापैकी 232 रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. प्रतिदिन प्रत्येक रुग्णासाठी सरासरी 10 ते 25 हजार लिटर्स प्रति मिनिट ऑक्सिजनची गरज आहे. त्यामुळे सध्या प्रतिदिन फक्त ‘गोमेकॉ’ इस्पितळातील कोविड रुग्णांसाठी 1.20 कोटी लिटर्स ऑक्सिजनची आवश्‍यकता आहे,  कोरोना संसर्गाची संख्या दिवसेंदिवस वाढत राहिल्यास प्रतिदिन कोविड रुग्णांसाठी तीन कोटी लिटर्स प्राणवायुची आवश्‍यकता भासण्याची शक्यता आहे अशी माहिती डीन डॉ. शिवानंद बांदेकर यांनी दिली. 

सध्या दरदिवशी ‘गोमेकॉ’ इस्पितळासाठी वैद्यकीय ऑक्सिजनच्या 40 ट्रॉलीचा पुरवठा होतो. प्रत्येक ट्रॉलीमध्ये 336 घनमीटर ऑक्सिजन असतो. राज्यातील खासगी ऑक्सिजन निर्मिती पुरवठादार तसेच बेल्लारी येथून हा पुरवठा होत आहे. केंद्र सरकारी पातळीवर कोल्हापूर येथून ऑक्सिजनचा साठा गोव्याला होणार असला, तरी अजून तो झालेला नाही. या ऑक्सिजनचा पुरवठा केंद्राच्या सूचनेनुसार केला जाणार आहे. सध्या ‘गोमेकॉ’ इस्पितळात 20 हजार घनमीटर तर दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात 5 हजार घनमीटर ऑक्सिजनची आवश्‍यकता भासत आहे.

गोव्यातील 13 दवाखाने बंद; साडेतीन लाख कर्मचारी प्राथमिक आरोग्य केंद्रांकडे वळणार 

सरकार ऑक्सिजन साठ्याच्‍या प्रयत्‍नात
इस्पितळात ऑक्सिजनवर उपचार घेत असलेल्या कोविड रुग्णांसाठी पुरेसा साठा असल्याचे सांगितले जात असले, तरी सरकार अजूनही ऑक्सिजन साठ्यासाठी धडपडत आहे. खासगी ऑक्सिजन पुरवठादारांना आपत्कालिन व्यवस्थापन कायद्याचा बडगा दाखवून अधिकाधिक मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहेत. वेळोवेळी ऑक्सिजनचा आढावा खुद्द आरोग्यमंत्री सर्व इस्पितळामध्ये प्रत्यक्ष तेथे जाऊन घेत आहेत व यावरून राज्यात ऑक्सिजनसाठीची किती गंभीर परिस्थिती आहे हे लोकांनाही कळून चुकले आहे.(Gomeco Hospital uses 1 crore 40 lakhs liters of oxygen per day)

लस घेतलेला एकही दगावला नाही
सध्या प्रतिदिन 300 पेक्षा अधिक रुग्णांचा सीटी स्कॅन काढला जात आहे. कोविड लस घेतलेला आतापर्यंत एकही रुग्ण दगावलेला नाही, अशी माहिती बांदेकर यांनी दिली. यापूर्वी गोव्यात वैद्यकीय ऑक्सिजनची मागणी इतक्या मोठ्या प्रमाणात भासली नाही. सुपरस्पेशालिटीच्या इस्पितळात 20 हजारपर्यंतचा द्रव्य ऑक्सिजन साठा करण्यासाठी टाकी आहे. तसेच 120 खाटांचे आयसीयू विभागही आहे. रुग्ण वाढत असल्याने गोमेकॉ इस्‍पितळात काही प्रभाग कोविड रुग्णांसाठी घेण्यात आले आहेत, असे बांदेकर यांनी सांगितले.

तरुण तेजपाल प्रकरणाचा निकाल 12 मे पर्यंत तहकूब 

... असा लागतो ऑक्सिजन?
इस्पितळाच्या डॉक्टरांकडून मिळालेल्या माहितीनुसार नॉन इन्वेसिव्ह व्‍हेंटिलेटर (एनआयव्ही) प्रत्येक रुग्णाला 25 लिटर्स प्रति मिनिट ऑक्सिजनप्रमाणे प्रत्येक दिवसाला एका रुग्णाला 36 हजार लिटर्स ऑक्सिजन लागतो. नाकाने श्‍वाच्छोश्‍वासासाठी प्रत्येक रुग्णाला प्रति मिनिट 15 लिटर्स ऑक्सिजन प्रमाणे दिवसाला 21 हजार 600 लिटर्स ऑक्सिजन लागतो. इन्वेसिव्ह व्‍हेंटिलेटर (इनटुबिटेड) रुग्णांसाठी 10 लिटर्स ऑक्सिजन प्रत्येक मिनिटाला त्यानुसार एका दिवसाला 14 हजार 400 लिटर्स ऑक्सिजनची आवश्‍यकता भासते. त्यामुळे सध्या वैद्यकीय ऑक्सिजनवर उपचार सुरू असलेल्या 232 रुग्णांना एकूण 1 कोटी 40 लाख लिटर्स ऑक्सिजन प्रतिदिन वापरला जात आहे.

गोवाः चार पालिकांनावर फडकला भाजपचा झेंडा 

संबंधित बातम्या