गोमेकॉकडून यशस्वी अवयवदान

दैनिक गोमन्तक
मंगळवार, 8 डिसेंबर 2020

गोवा वैद्यकीय महाविद्यालय, बांबोळी (गोमेकॉ) येथील डॉक्टरांनी प्रथमच ब्रेन डेड रुग्णाचे अवयव काढून ते प्रत्यारोपणासाठी पाठविण्याची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली.

पणजी: गोवा वैद्यकीय महाविद्यालय, बांबोळी (गोमेकॉ) येथील डॉक्टरांनी प्रथमच ब्रेन डेड रुग्णाचे अवयव काढून ते प्रत्यारोपणासाठी पाठविण्याची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली.

गोमेकॉने अवयव दान आणि प्रत्यारोपणासाठी केलेला हा पहिला यशस्वी प्रयत्न असून याबद्दल त्यांचे आभार आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी व्यक्त केले.

राज्य अवयव आणि पेशी प्रत्यारोपण रजिस्ट्रीमध्ये म्हणजेच सोटोमधील अनुक्रमे ऑर्डरनुसार देणगी दिलेली मूत्रपिंड दोन प्राप्तकर्त्यांकडे प्रत्यारोपित केली जाणार असल्याची माहितीसुद्धा आरोग्यमंत्री राणे यांनी दिली आहे.

संबंधित बातम्या