गोमंतकीयांसाठी आनंदाची बातमी; केंद्र सरकारकडून विकासकामांना निधी 

दैनिक गोमंतक
गुरुवार, 15 एप्रिल 2021

केंद्रिय महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी राज्यातील 128 कोटी 66 लाख रुपये खर्चाच्या विविध विकासकामांना मंजुरी दिली आहे.

पणजी: केंद्रिय महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी राज्यातील 128 कोटी 66 लाख रुपये खर्चाच्या विविध विकासकामांना मंजुरी दिली आहे. याबाबत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी त्यांचे आभार मानले आहेत. या कामांत रायबंदर दुपदरी बगलमार्गाच्या कामाचा समावेश आहे. यात राज्य सरकारने खर्च केलेले 53 कोटी 27 लाख रुपये केंद्र सरकार परताव्याच्या रुपात देणार आहे. अर्धफोंड पूल, मडगाव येथील उड्डाण पूल आणि माशे पुलासाठी 6 कोटी 75 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. भाटपाल पुलासाठी 1 कोटी 92 लाख रुपये तर करमल घाटातील वळणे कापून काढण्यासाठी 4 कोटी 20 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. (Good news for Gomantakis Funding for development works from the Central Government)

गोवा: 'टीका उत्सवावरून' निवडणूक आयोगाचा राज्य सरकारला इशारा

पणजी काणकोण महामार्ग रुंदीकरणाच्या उर्वरीत कामासाठी 44 कोटी 80 लाख रुपये, नव्या मांडवी पुलाचे एलास्टोमेट्रीक बिअरींग बदलण्यासाठी 11 कोटी 45 लाख रुपये खर्चास मंजुरी देण्यात आली आहे.राष्‍ट्रीय महामार्ग विस्‍तारीकरणाचे काम अंतिम टप्‍प्‍यात असून ते पूर्णत्त्‍वाकडे नेण्‍याकडे युद्धपातळीवर प्रयत्‍न सुरू आहेत. काही ठिकाणी पुलांचे काम बाकी आहे. रस्‍त्‍यांचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्‍याकडे कंपनी ठेकेदाराचे लक्ष्‍य आहे. त्‍यादृष्‍टीने काम सुरू आहे.

संबंधित बातम्या