82 'आयुष' डॉक्टरांना खूषखबर!

डॉक्टरांनी केली मागणी, सरकारने त्यांच्या वेतनात 50 हजार रुपयांपर्यंत केली वाढ.
 82 'आयुष' डॉक्टरांना खूषखबर!
AYUSH Doctors Dainik Gomantak

पणजी / कुडचडे : कोविड काळात अपुऱ्या डॉक्टरांमुळे (Doctor) राज्यातील विविध आरोग्य केंद्रांमध्ये राष्ट्रीय आरोग्य मिशनखाली एनएचएम (National Health Mission) 82 आयुष डॉक्टरांची नेमणूक केली होती. या डॉक्टरांना 20 हजारांचे वेतन ठरवण्यात आले होते. हे वेतन (Salary increase) खूप कमी असल्याने त्यामध्ये वाढ करण्याची मागणी या (AYUSH Doctors) डॉक्टरांनी केली होती. सरकारने आज त्यांच्या वेतनात 50 हजार रुपयांपर्यंत वाढ केली आहे.

या डॉक्टरांना देण्यात येणारे वेतन हे सरकारी खात्यातील सुरक्षारक्षकाच्‍या वेतनापेक्षा कमी असल्याने त्यामध्ये वाढ करण्यासाठी डॉक्‍टरांनी मुख्‍यमंत्र्यांना निवेदन दिले होते. ‘दैनिक गोमन्‍तक’ (Dainik Gomantak) मध्‍येही यासंबंधी वृत्त दोनवेळा ठळकपणे प्रसिद्ध झाले होते. तसेच गोवा फॉरवर्डने आवाज उठविला होता. अखेर मुख्‍यमंत्र्यांनी त्‍या डॉक्‍टरांची दखल घेत पगावाढ देण्‍यासंबंधी आदेशाचे पत्र दिल्‍याने त्‍यांनी समाधान व्‍यक्त केले आहे.

AYUSH Doctors
पावसाचा जोर कायमच, राज्यात 'यलो अलर्ट'

पाठपुराव्‍याला यश : फॉरवर्ड

या डॉक्टरांच्या वेतनवाढीसंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना गोवा फॉरवर्डचे संघटन सचिव दुर्गादास कामत म्हणाले की, 4 मे 2021 रोजी पक्षाचे अध्यक्ष व आमदार विजय सरदेसाई यांनी या आयुष डॉक्टरांचा वेतनवाढीचा प्रश्‍न उपस्थित केला होता. सरकारकडून दिले जाणारे हे वेतन मल्‍टिटास्किंग कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या वेतनापेक्षा खूपच कमी आहे. तसेच त्यांच्या या कामाला न शोभणारे असल्याचे मत व्यक्त केले होते. यासंदर्भात त्यांनी विधानसभेत आवाज उठविला होता. त्यावेळी आरोग्यमंत्र्यांनी त्‍यामध्ये लक्ष घालण्याचे आश्‍वासनही दिले होते. उशिरा का होईना, पक्षाने केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले, असे श्री. कामत म्‍हणाले.

मुख्‍यमंत्र्यांचे मानले आभार

आयुष डॉक्‍टरांचा प्रश्‍‍न मार्गी लावल्‍याबद्दल राज्यातील आयुष्य डॉक्टर संघटनेने मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Chief Minister Pramod Sawant) यांचे आभार मानले आहेत. सरकारने शब्‍द दिल्‍याप्रमाणे तो पाळला व वेतनवाढ परिपत्रक काढून दिलासा दिल्‍याबद्दल आनंद व्‍यक्त केला आहे.

मे 2020 रोजी डॉक्टरांच्या प्रस्तावाला मंजुरी दिली होती. पण, प्रशासकीय कामातील विलंबामुळे व कोविड काळात वेतनवाढ हा विषय पुन्हा एकदा सरकारच्‍या निदर्शनास आल्याने मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी त्वरित हालचाली करून आयुष्य डॉक्टरांच्या वेतनवाढीला हिरवा कंदील दाखवित मे 2020 पासून मासिक 50 हजार वेतन निश्‍चित केले आहे. आयुष्य खात्यांतर्गत विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या सर्व डॉक्टरांना या वाढीव वेतनाचा लाभ मिळणार आहे.

-प्रमोद सावंत, मुख्‍यमंत्री सरकारकडून वेतनात भरमसाट वाढ : आदेश जारी

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com