खुशखबर! वास्को-पाटणा एक्स्प्रेस धावणार

गोमंतक वृत्तसेवा
शनिवार, 17 ऑक्टोबर 2020

हळुहळु पण नक्कीच, वास्को रेल्वे स्थानकावरुन सुटणाऱ्या लांब पल्ल्याच्या सर्व रेल्वे गाड्या सुरू करण्यात येणार आहे असे रेल्वे सूत्रांकडून सांगण्यात आले.वास्को-पाटणा एक्स्प्रेस येत्या आठवड्यात सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मुरगाव:  हळुहळु पण नक्कीच, वास्को रेल्वे स्थानकावरुन सुटणाऱ्या लांब पल्ल्याच्या सर्व रेल्वे गाड्या सुरू करण्यात येणार असल्याचे रेल्वे सूत्रांकडून सांगण्यात आले.  सध्या वास्को-पाटणा एक्स्प्रेस येत्या आठवड्यात सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

कोरोना काळआत वाहतूक व्यवस्था ठप्प पडल्याने सामान्य नागरिकांना येण्या-जाण्याच्या त्रासाला सामोरे जावे लागले. परंतु आता ती समस्या दूर करण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाकडून घेण्यात आला आहे.

  वास्को कुळे पेसेंजर ट्रेन सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे. वास्को रेल्वे स्थानक व्यवस्थापक रामदास गुडमने यांच्याशी संपर्क साधला असता, पुढील आठवड्यात वास्को पाटणा रेल्वे सेवा सुरू होईल याची पुष्टी केली. "आमच्याकडे माहिती आहे की २१ ऑक्टोबरपासून वास्को पटना गाड्यांची सेवा सुरू होईल. १२१११ ही गाडी बुधवारी वास्को येथून सुटेल. ही विशेष ट्रेन आहे आत्तापर्यंत काही गाड्या बंद केल्या आहेत  आणि फक्त विशेष गाड्या आहेत.  गोवा एक्स्प्रेस आणि हमसफर एक्स्प्रेस सुरू आहे. गाड्यांना चांगला प्रतिसाद मिळत असून हळूहळू सुधारणा होत आहेत.

हमसफर एक्स्प्रेस दर शुक्रवारी दुपारी १२  वाजता वास्को येथून दिल्लीकडे सुटेल, पटना एक्स्प्रेस सुटेल. गोवा एक्स्प्रेस दररोज दुपारी सुटेल . आता वास्को कुळे लोकल ट्रेन सुरू करण्याची मागणीवर प्रक्रिया सुरू आहे तीही लोकल  ट्रेनही लवकरच सुरू होऊ शकेल असे ते म्हणाले.

संबंधित बातम्या