म्हापशातील रक्तदान शिबिराला चांगला प्रतिसाद

Good response to the blood donation camp
Good response to the blood donation camp

म्हापसा,

कोविड १९ महामारीच्या काळात आपल्या देशात तसेच राज्यात आज अनेक कोरोना रुग्ण सापडत आहेत. या कठीण काळात रक्तदान करण्याचा आदेश वामनाश्रम स्वामीजीने दिल्यानंतर वैश्य गुरु सेवा समितीने म्हापसा शहरात काल आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला उदंड प्रतिसाद लाभला. गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रक्त पेढीच्या डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी उत्तम सेवा दिली. सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत ५० लोकांनी रक्तदान केले.
वैश्य गुरुसेवा समिती गोवा, वैश्य गुरु सेवा समिती म्हापसा व महारुद्र संस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिराच्या उद्‍घाटन सोहळ्याला निवृत्त जिल्हाधिकारी व अखिल भारतीय वैश्य महासंघाचे समन्वयक नारायण दास अग्रवाल, ज्ञान प्रसारक मंडळाचे माजी अध्यक्ष जगन्नाथ मणेरकर, वैश्य गुरु सेवा समितीचे गोवा अध्यक्ष सुमित्र वेरेकर, म्हापसा अध्यक्ष विलास पिळणकर, माजी नगराध्यक्ष संदीप फळारी, नगरसेवक तुषार टोपले, संजय मिशाळ, महारुद्र संस्थानचे अध्यक्ष सोमनाथ नाटेकर, गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रक्त पेढीचे डॉ. पास्कॉल डिसोझा, माजी नगराध्यक्ष आशिश शिरोडकर, सतीश आर्सेकर, किरण शिरोडकर, अमर कवळेकर, गुरुप्रसाद पावस्कर यांची उपस्थिती होती.
प्रमुख पाहुणे माजी जिल्हाधिकारी एन. डी. अगरवाल यानी सांगितले, की आपल्या देशात वैश्य समाजाला अनेक नावानी ओळखले जातात. वैश्य समाज हा दान करणारा समाज आहे. वैश्य महासंघातर्फे उच्च शिक्षित करण्यासाठी मोठे योगदान आहे. प्रत्येक वैश्य बांधवाची शिरगणती करण्यासाठी आय.व्ही पी. मध्ये १०० रुपये टाकून आपली नोंदणी करा. देशातला वैश्य समाज कोरोनाच्या लढाईत तन-मन-धनाच्या रुपाने सरकारच्या मागे उभा आहे.
रक्तदान केलेल्या नागरीकाचे अभिनंदन प्रशस्तीपत्र देऊन केले. रामदास फळारी, उदय पिळणकर, वासुदेव आमोणकर, सतिश नार्वेकर, संजू सावंत, अरुण पिळणकर, रजनिश तेली, केवल शिरोडकर, अमय नाटेकर, सुदेश नाटेकर, सोनल पिळणकर, माजी नगरसेविका निता नाटेकर, दत्तदास कवळेकर, उर्वेश नाटेकर, श्रेयश कवळेकर, गणेश पिळणकर, विधा पिळणकर, तन्वेश केणी, किशोर सिरसाट आदि मान्यवरांच्या हस्ते रक्तदान करणाऱ्याचा गौरव केला.
संपादन - तेजश्री कुंभार 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com