डिचोलीत ‘कोविड ‘कॉल सेंटर’ला चांगला प्रतिसाद

Good response to covid call center in Bicholim
Good response to covid call center in Bicholim

डिचोली: ‘कोविड’(Covid-19) संकटाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनातर्फे ‘कोविड’ रुग्णांच्या सेवेसाठी डिचोलीत(Bicholim) ‘कॉल सेंटर’(Call Center) कार्यान्वित करण्यात आले आहे. या केंद्राच्या माध्यमातून गृह अलगीकरणात असलेल्या ‘कोविड’ रुग्णांच्या तब्येतीची वेळचेवेळी विचारपूस करण्यात येणार आहे. (Good response to covid call center in Bicholim)

येथील श्री शांतादुर्गा उच्च माध्यमिक विद्यालयात हे कॉल सेंटर कार्यान्वित करण्यात आले असून, 30 कर्मचाऱ्यांची नियुक्‍ती करण्यात आली आहे. चोविस तास सुरू राहणाऱ्या या केंद्रातील कर्मचारी पाळीनुसार काम करणार आहेत. या केंद्रातील कर्मचारी गृह अलगीकरणात असलेल्या तालुक्‍यातील रुग्णांशी संपर्क साधून त्यांच्या तब्येतीची चौकशी करणार आहेत. ताप, सर्दी, कफ, श्वासोच्छवास आदी समस्येने ग्रस्त असलेल्या रुग्णांची माहिती आरोग्य खात्याच्या पोर्टल सॉफ्टवेअरवर संकलीत करणार आहेत. वैद्यकीय उपचारांची गरज असलेल्या रुग्णांना कोविड इस्पितळात दाखल करण्यात येणार आहे.

दरम्यान, डिचोलीचे मामलेदार प्रवीणजय पंडित यांच्या उपस्थितीत डिचोली तालुक्‍याचे इन्सिडंट कमांडर संजीव गडकर (आयएएस) यांनी मंगळवारी या केंद्राची पाहणी करून केंद्रातील व्यवस्थेचा आढावा घेतला. या केंद्रामुळे आता गृह अलगीकरणातील ‘कोविड’ रुग्णांच्या तब्येतीची वेळोवेळी माहिती उपलब्ध होणार आहे. आवश्‍यक त्या रुग्णांना वेळीच इस्पितळात दाखल करण्यात मदत होणार आहे,  असा विश्वास मामलेदार श्री. पंडित यांनी व्यक्‍त केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com