गोव्यात सध्या कोरोना रुग्ण वाढल्याने पालकांत धाकधूक

Good response of students to 10th class in Fonda taluka
Good response of students to 10th class in Fonda taluka

फोंडा :राज्यातील दहावी व बारावीचे वर्ग सुरू झाले असून फोंडा तालुक्‍यातून या शैक्षणिक वर्गांना विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा चांगला प्रतिसाद लाभला आहे. कोरोना महामारीच्या काळात शैक्षणिक संस्था बंदच राहिल्या होत्या, पण नंतरच्या काळात कोरोनाचे संक्रमण बऱ्याच अंशी कमी झाल्याने दहावी व बारावीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे, तरीपण आता कोरोनाचे रुग्ण किंचित वाढल्याने पालकांत धाकधूक सुरू आहे. या वाढत्या कोरोनावर मात करण्यासाठी सरकारने प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी पाल:कांकडून करण्यात येत आहे.


राज्यातील शैक्षणिक संस्था सुरू झाल्यानंतर फोंडा तालुक्‍यातील सर्वच विद्यालयांनी तसेच उच्च माध्यमिक विद्यालयांनी आपापल्यापरीने आवश्‍यक ती खबरदारी घेतली आहे. कोरोनाचे संक्रमण विद्यार्थ्यांपर्यंत पोचू नये यासाठी संबंधित विद्यालयांचा शिक्षक व शिक्षकेतर वर्गाने प्रभावी उपाययोजना केली आहे. तरीपण अधिक खबरदारी घेण्याची सध्या तरी गरज निर्माण झाली आहे. 


फोंडा तालुक्‍यातील दहावीच्या वर्गांना विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद लाभल्याने शिक्षकांनाही शिकवणी घेणे सोयिस्कर ठरले आहे. एरव्ही ऑनलाईन शिक्षण पद्धती आणि प्रत्यक्षात शिक्षण पद्धती यात जमीन अस्मानाचा फरक असून प्रत्यक्षात शिकवणीतूनच विद्यार्थ्यांपर्यंत अभ्यासक्रम योग्यरीत्या पोचवणे शक्‍य होते, अशा खुद्द पालकांच्या प्रतिक्रिया आहेत. त्यातच विद्यार्थ्यांनीही प्रत्यक्षात वर्ग सुरू करण्याच्या प्रक्रियेला चांगला प्रतिसाद दिल्याने दहावी आणि बारावी इयत्तेतील विद्यार्थ्यांना ते उपयुक्त ठरले आहे. 


फोंडा तालुक्‍यात सध्या किंचित कोरोना रुग्ण वाढल्याने काहिशी काळजी व्यक्त करण्यात येत आहे, तरीपण तालुक्‍यातील सर्वच विद्यालये व उच्च माध्यमिक विद्यालयांनी सरकारच्या कोरोनासंबंधीच्या नियम व अटींचे पालन करण्यावर जास्त भर दिला आहे. नजीकच्या काळात कोरोना नाहिसा झाल्यास विद्यालये, उच्च माध्यमिक विद्यालये व महाविद्यालये पूर्णपणे खुली होतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे, मात्र प्रत्येकाने खबरदारी घेणे गरजेचे असल्याचे मतही व्यक्त होत आहे. 

आणखी वाचा:

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com