गोवेकरांनो रात्री बाहेर पडताय? थांबा, आधी हे' वाचा, नाहीतर.. 

goa police.jpg
goa police.jpg

पणजी : राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कडक निर्बंध लागू केले आहेत. या निर्बंधांची काटेकोर अंमलबजावणी व्हावी यासाठी राज्यात 1500 पोलिस कर्मचारी 24 तासांसाठी तैनात करण्यात आले आहे.  राज्यात कोरोना रुग्णसंख्येतील वाढ लक्षात घेता गोवा सरकारने 21 एप्रिल ते 30 एप्रिल या कालावधीत राज्यात रात्रीचा कर्फ्यू (Goa Night Curfew)  लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. रात्री 10 ते सकाळी पहाटे 6 पर्यंत नागरिकांना समूहाने एकत्र येण्याची आणि रात्रीच्या वेळी बाहेर पडण्याची मुभा दिली जाणार नसल्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी म्हटले आहे. (Govekars go out at night? Wait, read this first, otherwise ..) 

याबाबत बोलताना दक्षिण गोव्याचे पोलिस अधीक्षक पंकज कुमार सिंग (Goa Police)   यांनी माहिती दिली आहे.  फेस मास्क  नसलेल्या आणि सामाजिक अंतर न राखणाऱ्यांना पकडून त्यांच्यावर कडक कारवाई केली जात आहे आहे. या महिन्यात मास्क न घालणाऱ्या आणि कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन न करणाऱ्या तब्बल 30 हजार जणांना दंड ठोठावण्यात आला आहे. यात उत्तर गोव्यातून 13,620 जणांवर तर दक्षिण गोव्यातून 12,392 तर गोव्याच्या ट्राफिक सेलने 4,352 जणांना दंड ठोठावला आहे.  त्याचबरोबर ''आम्ही मास्क वितरण आणि कोरोना प्रतिबंधक नियमांची अंमलबजावणी करण्यावर लक्ष केंद्रित करीत आहोत.  पीसीआर वाहनांच्या माध्यमातून घोषणा देत लसीकरण मोहिमेबाबत जनजागृती करत आहोत. तसेच, कोविड नियमांचे उल्लंघन करणार्‍यांना दंड ठोठावला जात असल्याचे एसपी पंकज कुमार सिंग  यांनी  सांगितले आहे. 

दरम्यान, दक्षिण गोव्यात वाहनांची अनावश्यक हालचाल रोखण्यासाठी रात्रीच्या वेळी पोलिसांची 26 पथके तैनात करण्यात आली आहेत.  याव्यतिरिक्त, पोलिस कर्मचारी मास्क वापरण्यासाठी आणि सामाजिक अंतर राखण्यासाठी जनजागृती देखील करत आहेत. यात विशेषत: बाजारपेठा, बसस्थानके, रेल्वे स्थानक, विमानतळ आणि पर्यटक व निवासी भागात जनजागृती करत असल्याचे यावेळी पंकज कुमार सिंग यांनी सांगितले.  त्याचबरोबर, पोलिस ठाण्यातील कर्मचार्‍यांव्यतिरिक्त, प्रत्येक पोलिस ठाण्यामध्ये एक प्लॅटून ( साठ सैनिकांची तुकडी) तैनात करण्यात आली आहे. सर्व हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि क्लबमध्ये कोविड मानदंडांचे उल्लंघन रोखण्यासाठी विशेष पथकेही तैनात केली आहेत. सर्व पोलिस निरीक्षक (पीआय), पोलिस उपअधीक्षक (डीवायएसपी), पोलिस अधीक्षक (एसपी) आणि पीसीआर व्हॅनमधून रात्री कर्फ्यूची अंमलबजावणी करण्यासाठी गस्त घालत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com