राज्यातील सर्व स्मारकांचे सुशोभिकरणास सरकार कटिबद्ध : मुख्यमंत्री

UNI
शुक्रवार, 29 जानेवारी 2021

फोंडा येथील क्रांती मैदानाच्या सुशोभिकरणासाठी वित्तीय मंजुरी सरकारने दिली होती. या कामासाठी गोवा साधनसुविधा विकास महामंडळाच्या निवडक यादीत समावेश असलेल्या सल्लागाराची नेमणूक करण्यात आली होती. ६० व्या गोवा मुक्तिदिनानिमित्त राज्यातील सर्व स्वातंत्र्य संग्राम स्मारकांचे सुशोभिकरणाचा संकल्प असून त्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज फोंड्याचे आमदार रवी नाईक यांच्या प्रश्‍नावर सभागृहात उत्तर देताना दिली.

पणजी - फोंडा येथील क्रांती मैदानाच्या सुशोभिकरणासाठी वित्तीय मंजुरी सरकारने दिली होती. या कामासाठी गोवा साधनसुविधा विकास महामंडळाच्या निवडक यादीत समावेश असलेल्या सल्लागाराची नेमणूक करण्यात आली होती. ६० व्या गोवा मुक्तिदिनानिमित्त राज्यातील सर्व स्वातंत्र्य संग्राम स्मारकांचे सुशोभिकरणाचा संकल्प असून त्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज फोंड्याचे आमदार रवी नाईक यांच्या प्रश्‍नावर सभागृहात उत्तर देताना दिली.

गोवा मुक्तीसाठी ज्या स्वातंत्र्यसैनिकांनी भाग घेतला तसेच हौतात्म्य पत्करले त्यांची नावे या स्मारकांवर लिहिण्यात येतील. राष्ट्रीयत्व भावना जागृत करण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. सत्तरीतील दीपाजी राणे व तेरेखोल येथील हिरवे गुरुजी यांच्या ऐतिहासिक स्मारकांचे नुतनीकरण करण्यात येणार आहे. क्रांती मैदान येथील स्मारकाच्या नुतनीकरणासाठी फोंडा पालिका व फोंड्याचे तत्कालिन आमदार लवू मामेलदार यांनी त्यासाठी प्रस्ताव सरकारला दिला होता. हल्लीच पणजीतील ‘पिंटोचे बंड’ या उद्यानाचे सुशोभिकरण करून त्याचे उद्‍घाटन करण्यात आले आहे. गृह खात्यामार्फत राज्यातील अनेक स्मारके ही क्रांती मैदाने घोषित करण्यात आली आहे, असे मुख्यमंत्र्यांनी उत्तर देताना सांगितले. 

फोंड्याचे आमदार रवी नाईक यांनी फोंड्यातील क्रांती मैदानाच्या सुशोभिकरणासाठी मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याचा प्रश्‍न उपस्थित केला होता. या मैदानाच्या सुशोभिकरणासाठीची परवानगी व मंजुरी एकाच दिवसात कशाप्रकारे मिळवण्यात आली व अशी किती कामे तत्परतेने हाती घेण्यात आली. अशी कोणती घाई या मैदानाच्या सुशोभिकरणासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याला झाली होती? या कामासाठी नियुक्त करण्यात आलेला सल्लागाराची नेमणूक अगोदर व त्यानंतर निवडक यादीतून निवड करण्यात आली आहे का? या एकूण गैरप्रकाराची व केलेल्या खर्चाची चौकशी करणार का असा प्रश्‍न त्यांनी विचारला होता. या कामासाठी वित्तीय मंजुरी होती का असा प्रश्‍न आमदार सुदिन ढवळीकर यांनी केला. 

बांधकाममंत्री दीपक पाऊस्कर यांनी नाईक यांच्या प्रश्‍नावर उत्तर देताना सांगितले, की क्रांती मैदानाच्या सुशोभिकरणावर सुमारे ४.८३ कोटी खर्च करण्यात आला. सल्लागारासाठी २० लाख रुपये देण्यात आले तर त्या ठिकाणी सिंहाचे पुतळे उभारण्यात आले आहेत त्यावर सुमारे ९१.९९ लाख रुपये खर्च झाले आहेत. हे काम बांधकाम खात्याने केले आहे. गोवा साधनसुविधा विकास महामंडळाच्या निवडक यादीतील सल्लागार नियुक्त करण्याची तरतूद आहे त्यामुळे गैर काहीच झालेले नाही. या मैदानाला इतिहास आहे त्यामुळे या मैदानाच्या सुशोभिकरणासाठी करण्यात आलेला खर्च सर्व परवानगी व मंजुरीने करण्यात आला आहे. 

या क्रांती मैदानाच्या सुशोभिकरणावेळी मधे उभारण्यात आलेल्या खांबामुळे त्याचे सौंदर्यच नष्ट झाले आहे. गैरप्रकार करून हे काम केले गेले आहे. या मैदानासाठीची जागा तत्कालिन संरक्षणमंत्री शरद पवार यांच्या काळात लष्कराकडून ताब्यात घेण्यात आली होती. या ठिकाणी असलेली काही जागा सरकारने संरक्षण मंत्रालयाबरोबर चर्चा करून ती ताब्यात घेतल्यास तेथे सुसज्ज मार्केट कॉम्प्लेक्स होऊ शकते. त्यामुळे प्रयत्न करण्याची विनंती आमदार रवी नाईक यांनी केली. राज्यात खरी क्रांती लोहिया मैदानावरून झाली होती त्यासाठी अंदाजित खर्च करण्यात आला होता, असा प्रश्‍न विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी केला. 

आमदार दिगंबर कामत यांच्या प्रश्‍नावर मी आश्‍वासन देऊ शकत नाही. कारण हा विषय उपस्थित केलेल्या विषयाशी नाही. संरक्षण मंत्रालयाशी बैठक घेण्यासाठी प्रयत्न करतो, असे आश्‍वासन मुख्यमंत्री सावंत यांनी विधानसभेत दिले.

Edited By - Prashant Patil

संबंधित बातम्या