सरकारी खात्यातील नोकरभरती स्‍थगित ठेवल्‍याने बेरोजगारांना फटका

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 11 सप्टेंबर 2020

सरकारी खात्यातील जागांसाठी रोजगार विनिमय केंद्रातून नावे पाठविली जातात. तसेच अनेकजण थेट अर्ज करतात. त्यामुळे बेरोजगारांची अधिकृत स्थितीची माहिती मिळणे कठीण होते. 

पणजी: राज्यात बेरोजगारीची संख्या अधिक असू शकते. काहीजण रोजगार विनिमय केंद्रामध्ये नोंदणी करत नाहीत. अनेकजण खासगी कंपन्यांच्या तसेच सरकारी खात्यातील रिक्त जागा भरण्यासाठी जाहिराती दिल्या जातात. सरकारी खात्यातील जागांसाठी रोजगार विनिमय केंद्रातून नावे पाठविली जातात. तसेच अनेकजण थेट अर्ज करतात. त्यामुळे बेरोजगारांची अधिकृत स्थितीची माहिती मिळणे कठीण होते. 

आणखी संख्‍या वाढू शकते!
कामगार व रोजगार खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय रोजगार विनिमय सेवा पद्धतीनुसार केंद्रात मतदारसंघवार उमेदवारांची नोंदणी केली जात नाही. राज्यात आता ऑनलाईन नोंदणी ४ फेब्रुवारी २०१९ पासून सुरू झाली आहे. तालुकावार त्याची माहिती जमा केली जाते. ऑनलाईन सुरू होण्यापूर्वी केंद्रामध्ये ज्यांनी नोंदणी केली होती त्यांची माहिती कामगार व रोजगार खात्याच्या ‘एनसीएस पोर्टल’वर घालण्यात आली असून संबंधित नोंदणी केलेल्या उमेदवाराने ती अपडेट करायला हवी. 

नोंदणी केलेल्या उमेदवार किंवा अर्जदारांना रोजगार विनिमय केंद्राकडून रोजगार कार्ड (एल अँड ई) देण्यासंदर्भात विचारविनिमय सध्या सुरू आहे. मात्र सध्याच्या कोविड महामारीमुळे ही प्रक्रिया जरा संथ झाली आहे. मोडेल करियर सेंटर (एमसीसी) खाली क्षेत्रीय रोजगार विनिमय, पणजीतर्फे नोंदणी झालेल्यांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी रोजगार मेळावे, कंपन्यांमध्ये नोकऱ्यांची संधी, करियरबाबत समुपदेशन व मार्गदर्शन, कार्यक्रम, परिषदा व कामासाठी आवश्‍यक असलेले कौशल्य प्रशिक्षण देण्यात येत आहे. कंपन्यांमध्ये ज्या प्रशिक्षणाचे कामगार हवे आहेत त्यानुसार या बेरोजगारांना कौशल्य प्रशिक्षण दिले जाते. 

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या