Goa Oxygen Crisis: ''गोमेकॉतील मृत्यु रोखण्यात सरकार अपयशी''

दैनिक गोमंतक
शुक्रवार, 14 मे 2021

गेल्या चार दिवसात काळ्या रात्रीत 1 ते पहाटे 6 वाजेपर्यंत 75 कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

पणजी: गेल्या चार दिवसात काळ्या रात्रीत 1 ते पहाटे 6 वाजेपर्यंत 75 कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. हा मृत्यू गोमेकॉ (Goa Medical College) इस्पितळातील प्राणवायू अभावामुळे व प्राणवायू पुरवठ्यातील  गैरव्यवस्थापणामुळे झाला आहे असे मत गोवा फॉरवर्डचे प्रमुख व आमदार विजय सरदेसाई (Vijay Sardesai) यांनी व्यक्त केले. राज्य सरकार हे मृत्यु रोखण्यात अपयशी ठरले आहे. सरकारची पूर्ण यंत्रणाच कोलमडलेली आहे. हे सरकार फक्त आपले जाहिरातबाजी तसेच जे कोणी कोरोना व्यवस्थापनातील त्रुटींचा पर्दाफाश करीत आहेत त्यांच्याविरुद्ध तक्रारी दाखल करण्याचा सपाटा लावला आहे. गोवा खंडपीठाने घटनेतील कलम 21 नुसार प्रत्येकाला जगण्याचा अधिकार असल्याचे सरकारला सुचित केले आहे. त्यामुळे आता मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने यामध्ये हस्तक्षेप करून व्यवस्थापनाचा ताबा घेण्याची वेळ आली आहे, असे मत सरदेसाई यांनी व्यक्त केले.

केंद्र सरकारकडे ऑक्सिजन पुरवठ्याची मागणी करण्याचे धाडस मुख्यमंत्र्यांकडे नाही

दरम्यान, गोव्यात पुरेसा ऑक्सिजन उपलब्ध नाही आणि मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांच्याकडे त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मागणी करण्याचे धाडस नाही, अशी टीका आम आदमी पक्षाचे राज्य संयोजक राहुल म्हांबरे यांनी केली आहे होती. गोव्याचा ऑक्सिजन (Oxygen) कोटा वाढवण्यासाठी सरकारने मोदी सरकारकडे ऑक्सिजन पुरवठ्याबाबत मागणी करावी, अशी ‘आप’ची सुरवातीपासूनच  भूमिका आहे. मात्र मुख्यमंत्र्यांच्या भित्रेपणामुळे ते याविषयी पंतप्रधानांशी  बोलायला संकोच करत आहेत, असे त्यांनी नमूद केले.

संबंधित बातम्या