Goa Sports: खेळाडूंना प्रशिक्षण आणि सुविधा देण्यात सरकार अपयशी; अमित पाटकर

आमच्या खेळाडूंना प्रशिक्षण आणि सुविधा देण्यात सरकार अपयशी ठरले, असा सणसणाती आरोप काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर यांनी केला.
Goa Congress President Amit Patkar
Goa Congress President Amit PatkarDainik Gomantak

पणजी: 36 व्या राष्ट्रीय खेळांचा समारोप होताच, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार व क्रीडा मंत्री गोविंद गावडे यांची गोव्याच्या खेळाडूंबद्दलची उदासीनता उघड झाली असून पदकतालिकेत गोवा सर्वात खालच्या तिसऱ्या क्रमांकावर आहे. आमच्या खेळाडूंना प्रशिक्षण आणि सुविधा देण्यात सरकार अपयशी ठरले, असा सणसणाती आरोप काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर यांनी केला.

(Government failure to provide training and facilities to athletes says Amit Patkar)

Goa Congress President Amit Patkar
Goa Road: गोव्यातील सर्वाधिक अपघातप्रवण क्षेत्रे फोंड्यात

गोव्यात राष्ट्रीय खेळांसाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी 450 कोटी खर्च करण्यात आले. परंतू भ्रष्ट डबल इंजिन भाजप सरकारच्या "मिशन कमिशन" मूळे सदर प्रकल्पांचे काम निकृष्ट दर्जाचे ठरले आहे. सन 2022 च्या राष्ट्रीय क्रिडा स्पर्धा गुजरातला हलवण्याच्या निर्णयाने गोव्याची लाज राखली गेली असे काँग्रेस पक्षाने म्हटले होते. 36 व्या राष्ट्रीय क्रिडा स्पर्धांच्या निकालाने आमची भूमीका खरी व योग्य असल्याचे सिद्ध झाले आहे असा दावा अमित पाटकर यांनी केला.

विविध खेळांमध्ये पाच कांस्यपदके जिंकून उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा आम्हाला अभिमान आहे. केवळ त्यांच्या मेहनतीनेच त्यांना फळ मिळाले आणि राज्याचा गौरव झाला. एकप्रकारे या खेळाडूंनी गोव्याची लाज राखली, असे अमित पाटकर म्हणाले.

Goa Congress President Amit Patkar
Goa News: पैंगीण-लोलयेतील वीजवाहिनी प्रस्तावाला प्रशासकीय मंजूरी

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि क्रीडा मंत्री गोविंद गावडे यांनी ३६ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत गोव्याच्या खेळाडूंच्या खराब कामगिरीबद्दल जनतेला स्पष्टीकरण द्यावे. या वर्षी गोव्यात क्रिडा स्पर्धांचे आयोजन झाले असते तर सरकारला खेळाडूंची हिच कामगिरी अपेक्षित होती का? असा सवाल अमित पाटकर यांनी केला.

करदात्यांच्या पैशातून कोट्यवधी रुपये खर्च करून इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्यांची नेमणूक करून राष्ट्रीय क्रिडा स्पर्धांच्या नावाने विविध कार्यक्रम आयोजित करण्यावरच भाजप सरकारने भर दिला, ही लाजिरवाणी गोष्ट आहे. सदर कंपन्यांकडून कमिशन मिळवीणे हेच भाजप सरकारचे धोरण होते असा आरोप अमित पाटकर यांनी केला आहे.

गोमंतकीय खेळाडूंना राष्ट्रीय खेळांमध्ये चांगली कामगिरी करण्यासाठी योग्य प्रशिक्षण आणि पुरेशा सुविधा पुरविण्याकडे सरकारने पूर्णपणे दुर्लक्ष केले. गोवा सरकारने राष्ट्रीय क्रिडा स्पर्धांच्या एकंदरीत तयारीबाबत श्वेतपत्रिका काढण्याची आमची मागणी आहे, अशी मागणी अमित पाटकर यांनी केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com