उद्यापासून गोव्यात मास्क न वापरणाऱ्यांवर कडक कारवाई होणार

गोमंतक वृत्तसेवा
सोमवार, 23 नोव्हेंबर 2020

उद्यापासून गोव्यात मास्क व वापरणाऱ्यांवर कडक कारवाई होणार

पणजी : सध्या देशभरात कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ होत आहे. काही राज्यांमध्ये कर्फ्यु लागू करण्याची वेळ आली असून, यातच आता कोरोनाची दुसरी लाट येणार असल्याची भीती व्यक्त होत आहे.

याच पार्श्वभूमीवर, गोव्यातील कोरोनाची स्थिती गंभीर होऊ नये, याकरिता कोरोना मार्गदर्शक सूचनांची काटेकोर अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. त्यामुळे उद्यापासून गोव्यात मास्क व लावणाऱ्यांवर कारवाई करून त्यांना २०० रुपायांंचा  दंड ठोठावण्यात येेेणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज पणजीत केली.

संबंधित बातम्या