येत्या वर्षभरात राज्यातील प्रत्येक गावाचा विकास करण्याचे गोवा सरकारचे लक्ष्य

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 6 डिसेंबर 2020

येत्या वर्षभरात राज्यातील प्रत्येक गावाचा विकास झाला पाहिजे, असे सरकारने लक्ष्य ठेवले आहे. त्यासाठी सुरु केलेल्या स्वयंपूर्ण गोवा मोहिमेची सुरवात उत्तम झाली असली तरी त्यात सातत्य ठेवले पाहिजे. तरच ग्रामविकासाची दखल राष्ट्रीय पातळीवर घेतली जाईल. यात पंचायती महत्वाची भूमिका बजावतील, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी नमूद केले.

पणजी :   येत्या वर्षभरात राज्यातील प्रत्येक गावाचा विकास झाला पाहिजे, असे सरकारने लक्ष्य ठेवले आहे. त्यासाठी सुरु केलेल्या स्वयंपूर्ण गोवा मोहिमेची सुरवात उत्तम झाली असली तरी त्यात सातत्य ठेवले पाहिजे. तरच ग्रामविकासाची दखल राष्ट्रीय पातळीवर घेतली जाईल. यात पंचायती महत्वाची भूमिका बजावतील, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी नमूद केले.

१९१ पंचायतींचे सरपंच, पंच आणि त्या गावातील स्वयंपूर्ण मित्र यांच्याशी आभासी पद्धतीने संवाद साधताना त्यांनी वरीलप्रमाणे विधान केले. ते म्हणाले, प्रत्येक शनिवार गावांच्या विकासासाठी देणाऱ्या स्वयंपूर्ण मित्रांचे अभिनंदन करावे तेवढे थोडेच आहे. ग्राम विकासाबाबत गोव्याचा क्रमांक देशात वरचा असेल. सर्वेक्षणाच्या प्रती ग्रामपंचातींना उपलब्ध करून दिल्या आहेत. त्याचा अभ्यास स्थानिक पातळीवर केला जावा. नेमके काय करायचे, हे टप्प्या टप्प्याने सांगितले जाईल. 

गोवा मुक्तीच्या षठ्यब्दीपूर्तीनिमित्त गावागावात कार्यक्रम आयोजित केले जातील. पंचायतींमध्ये विकासासाठी स्पर्धा घेण्यात येणार आहे. विभाग, तालुका राज्य पातळीवर ही स्पर्धा असेल. तिमाही अहवाल तयार करावा. कर्नाटकाला भाजीपाल्यासाठी २० कोटी रुपये दिले जातात. येथेच भाजीपाला उत्पादन झाले, तर तो पैसा येथेच राहिल याची नोंद घ्यावी.  साडेचार लाख लीटर दूध बाहेरून आणावे लागते ते चित्र पालटले पाहिजे. चिकन, मटण, अंडी बाहेरून आणावी लागतात. ते बंद करण्यासाठी येथेच त्याचे उत्पादन  वाढविले पाहिजे. पंचायतमंत्री माविन गुदिन्हो यांनी आपले विचार व्‍यक्त केले. पंचायत संचालक नारायण गाड यांनी संचालन केले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी पंच व सरपंचांच्या विविध प्रश्नांना उत्तरे देत शंका निरसन केले.

 

अधिक वाचा :

काणकोण मामलेदार कार्यालयातर्फे मतदार जागृती फेरी

गोव्यातील जिल्हा पंचायतींसाठी डिसेंबरला मतदान

संबंधित बातम्या