आता राज्यात होणार ऑनलाईन शुभमंगल सावधान!

गोमंतक वृत्तसेवा
रविवार, 8 नोव्हेंबर 2020

राज्यातील विवाहनोंदणी ऑनलाईनवर सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे आता या नोंदणीसाठी दोन्ही कुटुंबाकडील व्यक्तींना अर्ज करण्यासाठी उपनिबंधक कार्यालयात जाण्याची आवश्‍यकता नाही.

पणजी: राज्यातील विवाहनोंदणी ऑनलाईनवर सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे आता या नोंदणीसाठी दोन्ही कुटुंबाकडील व्यक्तींना अर्ज करण्यासाठी उपनिबंधक कार्यालयात जाण्याची आवश्‍यकता नाही.

ऑनलाईनवर अर्ज करून कार्यालयात नोंदणीसाठीची तारीख व वेळ घेणे शक्य होणार आहे. ही ऑनलाईन विवाहनोंदणी येत्या १६ नोव्हेंबरपासून राज्यात सर्व उपनिबंधक कार्यालयातून सुरू करण्यात येणार आहे.  या विवाहनोंदणीसाठी ऑनलाईन अर्जासोबत शुल्क जमा करण्याची पद्धतही ऑनलाईनवर उपलब्ध करण्यात आली आहे. शुल्क जमा केल्यानंतर अर्जदार त्याच्या सोयीनुसार जी तारीख व वेळ पाहिजे ती निवड करू शकतो. त्यामुळे अनेकांना वेळ वाचणार आहे व कार्यालयातही विवाहनोंदणीसाठी होणारी गर्दी टाळता येणार आहे. कोविड - १९ च्या पार्श्‍वभूमीवर अनेकांनी विवाहनोंदणी स्थगित ठेवली होती मात्र गेल्या काही महिन्यापासून विवाहनोंदणीसाठी येणाऱ्यांची संख्या वाढत आहेत. यावर उपाय म्हणून सरकारने ही ऑनलाईन पद्धत सुरू केली आहे.

 

संबंधित बातम्या