गोव्याचे शिल्पकार मनोहर पर्रीकर यांच्या स्मृतिस्थळाचा सरकारला विसर?

ज्यांनी गोवा राज्य साधनसुविधा विकास महामंडळ या संस्थेला जन्म घातला, त्याच महामंडळाला संस्थापक पर्रीकर यांचे स्मारक वेळेत पूर्ण करता येत नाही, यासारखे दुर्दैव नाही.
Manohar Parrikar Former Minister of India
Manohar Parrikar Former Minister of IndiaDainik Gomantak

पणजी: अडीच - तीन महिन्यांत ज्यांनी कालवी पूल, आयनॉक्ससारखे महत्त्‍वाकांक्षी प्रकल्प उभारले आणि गोव्याचे शिल्पकार म्हणून ओळख असणारे माजी मुख्यमंत्री, माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर (Manohar Parrikar) यांचे स्मारक इतके दिवस का रखडले? हा प्रश्न गोमंतकीयांना पडला आहे. ज्यांनी गोवा राज्य (Goa State) साधनसुविधा विकास महामंडळ (GSIDC) या संस्थेला जन्म घातला, त्याच महामंडळाला संस्थापक पर्रीकर यांचे स्मारक वेळेत पूर्ण करता येत नाही, यासारखे दुर्दैव नाही. याला राजकीय इच्छाशक्तीचा अभाव म्हणावे की अन्‍य काही, असा प्रश्‍‍न उपस्‍थित होत आहे.

Manohar Parrikar Former Minister of India
Goa: अचारसंहितेपूर्वीच सर्व सरकारी रिक्त पदे भरणार

देशाचे माजी संरक्षणमंत्री आणि माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे 17 मार्च 2019 रोजी पणजीत निधन झाले. त्यानंतर 18 मार्च 2019 रोजी मिरामार समुद्र किनाऱ्यावर पहिले मुख्यमंत्री दयानंद बांदोडकर यांच्या स्मारकाजवळ त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तिथेच मनोहर पर्रीकर यांचे स्मृतिस्थळ स्मारक उभारणार असल्‍याची घोषणा नव्या सरकारने सर्वप्रथम केली. मात्र, निविदा, सल्लगार प्रक्रिया यामुळे प्रत्यक्ष कामाची सुरवात 2 मार्च 2020 रोजी झाली.

प्रकल्‍पाचे काम पुन्‍हा रेंगाळले!

निविदेतील अंतिम तारखेनुसार हा प्रकल्प 1 सप्टेंबर 2020 रोजी पूर्ण होणार होता. मात्र, कोरोनामुळे मार्च, एप्रिल आणि मे महिन्‍यात प्रकल्पाला कामगार मिळू शकले नाहीत. आता नव्याने ३० डिसेंबरपर्यंत स्मारक पूर्ण करू, असे ‘जीएसआयडीसी’ने जाहीर केले आहे.

Manohar Parrikar Former Minister of India
11 व 12 वी परीक्षा ‘ऑफलाईन’

पर्रीकर आणि साधनसुविधांची निर्मिती

मनोहर पर्रीकर हे मुख्यमंत्री झाल्यानंतर 2001 मध्ये गोवा राज्य साधनसुविधा महामंडळाची निर्मिती केली. या महामंडळाच्यावतीने राज्यातील अनेक साधनसुविधा उभ्या केल्या. यात आयनॉक्स, ईएसजी इमारत, मेकॅनिज पॅलेस, आमोणा पूल, हळदोणे पूल, रवींद्र भवन, अटलसेतू, कला अकादमी नूतनीकरण, आयटी पार्क, बस स्थानके, मडगाव जिल्हा प्रशासन इमारत, मडगाव रुग्णालय, अनेक वास्तू, रस्ते, पूल यासारख्या साधनसुविधा उभ्या केल्या. बहुतांशी ही सर्व कामे निविदा प्रक्रियेतील वेळेनुसार पूर्ण करण्यात आली.

कामगारांच्या कमतरतेमुळे समाधीस्‍थळ व प्रकल्पाचे बंद राहिले. पण, आम्ही 30 डिसेंबरपर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्‍याचे लक्ष्‍य ठेवले आहे. प्रकल्पासाठी निधी उपलब्ध आहे.

- हरिष  अडकोणकर, सरव्यवस्थापक -जीएसआयडीसी.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com