गोंयकारांच्या हक्काबाबत सरकार उदासीन

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 13 नोव्हेंबर 2020

गोंयकारांच्या हक्काबाबत सरकार उदासीन बनलेले आहे. गोंयकारांच्या भवितव्याची सरकारला मुळीच पर्वा नाही. ऋण काढून सण साजरे करण्यासारखी सरकारची स्थिती बनललेली आहे. अशाही परिस्थितीत १० हजार सरकारी नोकऱ्या उपलब्ध करण्याची सरकारची घोषणा म्हणजे गोंयकारांच्या डोळ्यात केलेली धूळफेक आहे.

अस्नोडा  :  गोंयकारांच्या हक्काबाबत सरकार उदासीन बनलेले आहे. गोंयकारांच्या भवितव्याची सरकारला मुळीच पर्वा नाही. ऋण काढून सण साजरे करण्यासारखी सरकारची स्थिती बनललेली आहे. अशाही परिस्थितीत १० हजार सरकारी नोकऱ्या उपलब्ध करण्याची सरकारची घोषणा म्हणजे गोंयकारांच्या डोळ्यात केलेली धूळफेक आहे. परिसरात उभ्या राहणाऱ्या उद्योगाबाबत स्थानिक बेरोजगार युवक अनभिज्ञ आहेत. त्याचा गैरफायदा राजकारणी व्यक्ती घेत असतात. या दुष्ट प्रवृत्तीचा प्रखर विरोध करत पंचायतींच्या प्रत्येक ग्रामसभेला उपस्थित राहून तुमची मते परखडपणे मांडा. पंचायत क्षेत्रातील प्रत्येक औद्योगिक घडामोडींची दखल घ्या. उभ्या राहणाऱ्या उद्योगासाठी पंचायतीने ना हरकत दाखला देताना स्थानिकांच्या रोजगाराची तरतूद केली आहे का, नसल्यास तशी तरतूद करणारा ठराव ग्रामसभेत मंजूर करून घ्या. गोव्यात कुठल्याही उद्योगात स्थानिक गो॑यकाराच्या रोजगारीला प्राधान्य सक्तीचे करण्यात यावे, यासाठीच रिव्होल्युशनरी गोवा या संघटनेची निर्मिती झाली आहे, असे संघटनेचे संस्थापक मनोज परब यांनी सांगितले. डिचोली मतदारसंघातील पाचही पंचायती व पालिका क्षेत्रातील युवकांना त्यांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या रिव्होल्युशनरी गोवा या संघटनेचा फायदा अखेर गोंयकारांनाच होणार आहे. त्यासाठी तरुण बांधवांनो, आपली एकजूट अभेद्य राखा, अशी हाक रिव्होल्युशनरी गोवाचे संस्थापक अध्यक्ष मनोज परब यांनी दिली आहे.

नानोडा येथील श्री शांतादुर्गा स्पोर्ट्स क्लबच्या इमारतीत लाटंबार्से पंचायत क्षेत्रातील असंख्य युवकांना परब यांनी मार्गदर्शन केले. यावेळी त्यांच्यासोबत आर. जी. संघटनेचे विरेश बोरकर, कृष्‍णा परब, अनिश नाईक, अश्वेक घाटवळ आदी संघटक उपस्थित होते. यावेळी लाटंबार्से व इतर पंचायत क्षेत्रातील १०० हून अधिक युवा कार्यकर्ते उपस्थित होते. 
कुठल्याही राजकारण्याने, आमदाराने युवकांच्या न्याय हक्कांबाबत सरकारला कधी जाब विचारला नाही किंवा तसा प्रयत्नही आजवर कोणाकडूनही केला गेलेला नाही. मात्र रिव्होल्युशनरी गोवा स्वस्थ बसणारी नाही. येत्या विधानसभा अधिवेशनात विधेयक मांडून युवकांना १०० टक्के गृहकर्ज, औद्योगिक प्लॉट खरेदीसाठी कर्ज, उद्योगांसाठी स्थानिकांनाच परवाने आणि तत्सम हक्कांच्या योजनांचा समावेश असेल. विधेयकाच्या मंजुरीनंतर त्याचा लाभ गोंयकारांनाच होणार आहे. मात्र, त्यासाठी प्रत्येक पंचायत पातळीवरील युवकांनी अभेद्य एकजूट राखणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. नानोडा येथे स्थानिक बेरोजगार युवकांना डावलून उभ्या राहिलेल्या बियर निर्मिती उद्योगाच्या रोजगार धोरणाविरुद्ध परब यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली. स्थानिकांना रोजगारापासून वंचित करणाऱ्या सरकारच्या स्वार्थी धोरणाविरुद्ध परब यांनी कडक शब्दात टीका केली. 

एकजूट राखल्यासचभवितव्य उज्ज्वल
सरकारचे हे धोरण गोंयकारांच्या रोजगारावर गदा आणणारे आहे. मनोज परब यांनी दिलेल्या एकजुटीच्या हाकेला प्रत्युत्तर म्हणून डिचोली मतदार संघातील पाच ग्रामपंचायत क्षेत्रे आणि नगरपालिका क्षेत्रात मिळून येत्या डिसेंबर अखेरपर्यंत तळमळीच्या ५००० कार्यकर्त्यांची फौज तयार करण्याचे बैठकीत सर्वानुमते ठरविण्यात आले. प्रत्येक गोंयकाराने आपला गाव हाच आपला गोवा आणि आपला देश आहे हे वचन पाळून एकजूट कायम राखल्यास हीच ताकद गोंयकारांचे भवितव्य उज्वल बनवेल, अशी खात्रीही मनोज परब यांनी व्यक्त
केली.

संबंधित बातम्या