कळंगुटमधील अवैध व्यवसायांकडे सरकारचे दुर्लक्ष

डान्सबार आणि नाईटक्लबवरून काही दिवसांपूर्वी कळंगुटात स्थानिक लोक तसेच क्लबच्या दलालांमध्ये मोठ्या प्रमाणात मारहाणीचे प्रकार घडल्याचे समोर आले होते.
Calangute beach
Calangute beach Dainik Gomantak

कळंगुट : चंदगडच्या देशी पर्यटकांना म्हापसा शहरात दिवसाढवळ्या लुबाडण्याच्या घटनेने राज्यात जीवाचा गोवा करायला येत असलेल्या पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अशा घटनांमुळे राज्याचे नाव बदनाम तर होतेच; परंतु सहकुटुंब सहपरिवार गोव्याला भेट देण्यासाठी आयुष्याची कमाई खर्च करून राज्यात येणाऱ्या देशवासीयांच्या विश्वासाला तडा जातो हा भाग वेगळाच.

Calangute beach
नोकरभरतीसाठी फक्त साखळीतील तरुणांना प्राधान्य नाही : मुख्यमंत्री सावंत

चंदगडच्या घटनेनंतर दोषी आरोपींना गजाआड करण्यात पोलिसांना यश मिळाले ही गोष्ट चांगलीच. पण, पोलिसांच्या ताब्यात असलेल्या आरोपींकडून घडलेला हा प्रकार पहिलाच असेल कशावरून? सध्या हे प्रकरण गुन्हा अन्वेषण विभागाकडे सोपवण्यात आल्याने लवकरच या घटनेत सहभागी असलेल्या आरोपींचे कुकर्मे समोर येतील हे निश्चित.

देशी पर्यटकांपैकी कळंगुट आणि बागा येथील समुद्र किनाऱ्यांना भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्याही बेसुमार असते. गोवा म्हणजेच कळंगुट आणि बागा असा भ्रम जाणून बुजून देशी पर्यटकांच्या मनात निर्माण करण्यामागे याभागात सक्रीय असलेल्या बनावट गार्ड लोकांचा मोठा वाटा असतो. पर्यटकांना फसवणे आणि लुबाडणे हाच त्यांचा धर्म आणि व्यवसाय ही गोष्ट आता लपून राहिलेली नाही.

Calangute beach
महाराष्ट्रातील पर्यटकांना ‘ते’ आमिष पडले जास्तच महाग!

कळंगुटचाच विचार केल्यास अनेक गावे बेकायदा व्यवसाय तसेच अनैतिक कृत्यांचे आगर बनलेला आहे, असे आता याभागातील ग्रामस्थ स्वतःच सांगतात. जुगार, मटका, क्रिकेटचे बेटींग, अमलीपदार्थाची देवाण-घेवाण, वेश्याव्यवसायासाठी मानवी तस्करींची प्रकरणे या भागासाठी नवीन राहिलेली नाहीत. या सर्वांवर कळस म्हणजे याभागात फूलस्विंग चालणारे बेकायदा डान्सबार आणि नाईट कल्ब होय. स्थानिक पंचायत, स्थानिक राजकारणी आणि पोलिस यंत्रणा एकसंघ सक्रीय झाल्यास अशा लोकांचा या भागात टिकाव लागणार नाही; परंतु ‘कुंपणच जेव्हा शेत खाते’ तेव्हा अशा घटना घडणारच ही काळ्या दगडावरची रेघ आहे.

डान्सबार आणि नाईटक्लबवरून काही दिवसांपूर्वी कळंगुटात स्थानिक लोक तसेच क्लबच्या दलालांमध्ये मोठ्या प्रमाणात मारहाणीचे प्रकार घडल्याचे समोर आले होते. स्थानिक पोलिस यंत्रणा अशा लोकांवर कारवाई करण्यास अपयशी तसेच निष्क्रीय ठरल्याचा ठपका ठेवत स्थानिक लोकांनी खोब्रावाडा परिसरातील डेव्हील नाईट क्लबच्या दरवाजात आंदोलन छेडले होते. आजही याबाबतीत स्थानिकांच्या मनात खदखदणारा असंतोष दिसून येत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com