गोव्यातील सरकारी कार्यालये 15 मे पर्यंत निर्बंधात

गोमंन्तक वृत्तसेवा
शनिवार, 1 मे 2021

कोविड महामारीची दुसरी लाट तीव्र झाल्याने राज्य सरकारने सरकारी कार्यालयांमधील कर्मचारी उपस्थिती आणि कामकाज यावर घातलेले निर्बंध 15 मे पर्यंत वाढवले आहेत.

पणजी: कोविड महामारीची दुसरी लाट तीव्र झाल्याने राज्य सरकारने सरकारी कार्यालयांमधील कर्मचारी उपस्थिती आणि कामकाज यावर घातलेले निर्बंध 15 मे पर्यंत वाढवले आहेत. तसा आदेश सर्वसाधारण प्रशासन विभागाने आज जारी केला आहे.(Government offices in Goa under restrictions till May 15)

या आदेशानुसार, सरकारी कार्यालये मर्यादित कर्मचाऱ्यांनिशी कार्यरत राहणार आहेत. ‘क’ वर्गातील कर्मचारी अर्ध्या क्षमतेने कार्यरत राहणार असून त्यांच्याही वेगवेगळ्या वेळा ठरवून द्याव्यात, तसेच विविध खात्यांच्या प्रमुखांनी यासाठी त्यांची तीन तुकड्यांमध्ये विभागणी करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. ही बंधने 30 एप्रिलपर्यंत अंमलात होती आता त्यांना 15 मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. पोलिस, गृहरक्षक, नागरी सुरक्षा, अग्निशामक सेवा, आपत्ती व्यवस्थापन, तुरूंग, ट्रेजरी, जिल्हा प्रशासन, वनखाते आणि पालिका सेवा या नेहमीप्रमाणे कार्यरत राहणार आहेत. पण इतर सर्व सरकारी खाती, निमसरकारी विभाग आणि स्वायत्त संस्था तसेच अनुदानित संस्था या मर्यादित कर्मचाऱ्यांनिशी काम करणार आहेत.

गोवा: मोरजी किनाऱ्यावर आलिशान कार चालवणारा गजाआड 

‘अ’ आणि ‘ब’ गटातील अधिकाऱ्यांना हजर राहण्यास सांगण्यात आलेले असून ‘क’ गटातील आणि त्याखालील कर्मचारी पन्नास टक्के क्षमतेने कार्यरत राहतील. शारीरिक अंतर राखता यावे, यासाठी हा उपाय करण्यात आलेला आहे. मात्र लोकांना देण्यात येणाऱ्या सेवा व्यवस्थित मिळतील, याची काळजी घेतली जाणार असून त्याकरिता आवश्यक कर्मचारीवर्ग तैनात केला जाईल, असे पूर्वीच्या आदेशात म्हटले होते.

असा असणार टाइम टेबल

इतर सारे एक दिवसाआड अशा पद्धतीने घरून काम करणार असून अत्यंत आवश्यक असलेल्या कर्मचारी वर्गाला रोज हजेरी लावावी लागू शकते. त्याचप्रमाणे हजेरी लावणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वेगवेगळ्या वेळा राहतील. सकाळी 9 ते सायंकाळी 4, सकाळी 9.30 ते सायंकाळी 5 आणि सकाळी 10 ते सायंकाळी 5,30 अशा वेगवेगळ्या वेळा ठरवून कर्मचाऱ्यांचे 3 गट बनविले जाऊ शकतात, असे आदेशात म्हटले होते. त्याला आता 15 मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. जे कुणी घरून काम करतील ते दूरध्वनीवर आणि इतर इलेक्ट्रॉनिक दूरसंपर्क सुविधांवर सदासर्वकाळ उपलब्ध राहायला हवेत आणि जर त्यांना कुठल्याही गरजेच्या प्रसंगी बोलावले गेले, तर त्यांनी कचेरीत हजर राहायला हवे, असे या आदेशात म्हटले आहे.

Goa Lockdown: सांगे बाजारपेठ आजपासून बंद 

संबंधित बातम्या