मायबाप सरकार ‘बार’ला परवानी द्या!

मायबाप सरकार ‘बार’ला परवानी द्या!

पणजी,

टाळेबंदीच्या काळात अनेक नियम शिथील करून विविध व्यवसाय सुरू करण्यात आले. एका बाजूला दारूच्या दुकानांना वाढीव वेळ दिला, पण बार ॲण्ड रेस्टॉरंटला त्यातून वगळण्यात येत आहे. सरकारने बार ॲण्ड रेस्टॉरंट सुरू करण्यासाठी तत्काळ परवानगी द्यावी, अशी मागणी हॉटेल ॲण्ड रेस्टॉरंट संघटनेने निवेदनाद्वारे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याकडे केली आहे. त्यावर जुलैमध्ये हा व्यवसाय सुरू करण्याबाबत सरकार निर्णय घेईल, असे सांगून संघटनेच्या शिष्टमंडळाला आश्‍वस्त केल्याची महिती संघटनेचे अध्यक्ष गौरीश धोंड यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष गिरीश सरदेसाई, कॅफे तोता समुहाचे प्रदीप धुरी, गोपिका इंटरनॅशनलचे राजेश साळगावकर, रित्झ ग्रुपचे मालक राजेश देसाई, बीएसबीचे प्रल्हाद सुखटणकर आणि केणीज हॉटेलचे मालक अक्षय केणी यांची उपस्थिती होती.
धोंड म्हणाले की, राज्य सरकारने रेस्टॉरंट सुरू केले. पण, त्यासाठी रात्री नऊपर्यंत ते खुले ठेवण्याची वेळ दिली आहे. ती वेळ ११ वाजेपर्यंत वाढवून मिळावी, म्हणून आम्ही मागणी केली आहे. कारण सध्या स्थानिक ग्राहकांवरच हे रेस्टॉरंट चालले आहेत. राज्यात ३५ ते ४० पंचतारांकीत हॉटेल्स आहेत आणि ३ हजारच्या आसपास रेस्टॉरंट आहेत. बार बंद असल्याने रेस्टॉरंटच्या आर्थिक उलाढालीवर परिणाम झाला आहे. हॉटेल रेस्टॉरंट'या व्यवसायाशी राज्यातील किमान ३० ते ४० टक्के लोक अवलंबून आहेत. भाजी विक्रेता, टुरिस्ट टॅक्सी, मासळी विक्रेते, लॉण्ड्रीवाले यांसारखे काही घटक या व्यवसावर प्रत्यक्षात अवलंबून आहेत. त्यांचाही विचार सरकारने गरजेचे आहे, असे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
--------------------------
संघटेनेचे अध्यक्ष धोंड काय म्हणतात!
- मुख्यमंत्र्यांनी हा व्यवसाय सुरू करण्याबाबत आश्‍वस्त केले असून, जुलैमध्ये हा व्यवसाय सुरू होईल.
- मद्य व्यतिरिक्त रेस्टॉरंट चालविणे अशक्य आहे.
- देशातील दिल्ली, कर्नाटक, मुंबई, पंजाब या ठिकाणी बार सुरू झाले आहेत मग गोव्यातच ते बंद का?
- शहरातील सुस्थितीत, चांगली चाललेली सहा ते सात रेस्टॉरंट टाळेबंदीमुळे बंद पडली आहेत.
- गोमंतकीयांनाच बाहेर जाऊन जेवणाची मोठी आवड आहे, हे सरकारने लक्षात घ्यावे.
- आदर्श कार्यप्रणाली आणखी खाली आणावी आणि हा व्यवसाय सुरू करण्याविषयी पावले उचलावीत.
------------------------
कामगार येण्यास उत्सुक!
हॉटेलमधील आपल्या मायभूमीत परतेला कामगार पुन्हा गोव्यात परतण्यास इच्छुक आहे. आम्ही कामगारांची अजिबात अडवणूक केलेली नाही. ज्यांची इच्छा आहे, त्यांना जाऊ दिले आहे. परंतु आता ते कामगार गोव्यातील हॉटेल, रेस्टॉरंट सुरू होण्याची वाट पाहत आहेत. अनके कामगारांचा सतत संपर्क होत असल्याची माहिती धोंड यांनी दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com