CM Pramod Sawant: राज्यातील सरकारी शाळांना स्वातंत्र्यसैनिकांची नावे देणार

मुख्यमंत्र्यांनी 75 व्या स्वातंत्र्यदिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या
Pramod Sawant
Pramod SawantDainik Gomantak

75 व्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने आज पेडणे येथे कार्यक्रम पार पडला. यावेळी डॉक्टर प्रमोद सावंत यांनी या कार्यक्रमास प्रमूख उपस्थीत होते. या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी 75 व्या स्वातंत्र्यदिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सरकारी शाळांच्याबद्दल घोषणा केली आहे. पेडणे येथील कार्यक्रमात त्यांनी केली घोषणा.

(Government schools in Goa state will be named after freedom fighters - Chief Minister Pramod Sawant)

Pramod Sawant
MLA Divya Rane: स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच देशामध्ये उत्साही माहोल

यावेळी मुख्यमंत्र्यांनी देशाला स्वातंत्र्य देण्यासाठी ज्यांनी ज्यांनी आपल्या प्राणांची आहूती दिली. ज्यांनी बलिदान दिले आहे. ते कधी वाया जाणार नाही. असे ते म्हणाले. यावेळी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी राज्यातील सरकारी शाळांना स्वातंत्र्यसैनिकांचे नाव देणार असल्याची घोषणा केली आहे.

मुख्यमंत्री म्हणाले की, आज राज्यातील सर्व स्वातंत्र्यसेनानी आहेत. त्यांना अथवा त्यांच्या नातेवाईकांना आज प्रतिनिधींच्याद्वारे विशेष सन्मानपत्रे देत सन्मानित केले आहे. त्यामूळे आपण या कार्यक्रमात सर्वांच्या स्मृती जाग्या झाल्या असे ही ते यावेळी म्हणाले. या कार्यक्रमास आमदार प्रविण आर्लेकर यांच्यासह अनेक भाजप नेते उपस्थितीत होते.

Pramod Sawant
75th Indian Independence Day: वाळपई जिल्‍हाधिकारी कार्यालयात उत्साहात

पत्रादेवी येथे हुतात्मा स्मारक उभारणार - मुख्यमंत्री

75 व्या स्वातंत्र्यदिनाच्यानिमित्ताने आज पत्रादेवी येथे कार्यक्रम पार पडला. यावेळी डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले. या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी 75 व्या स्वातंत्र्यदिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. आपल्या स्वप्नातील भारत साकार करण्यासाठी आपल्या आयुष्यातील ध्येयांचा पाठलाग करुया असे ते म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com