पालक-शिक्षकांना विश्वासात घेण्याची गरज: नाईक

गोमंतक वृत्तसेवा
शनिवार, 7 नोव्हेंबर 2020

सरकारने शाळा सुरू करण्याचा घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे. मात्र तो निर्णय मुलांच्या आरोग्याशी खेळणारा नसावा, याची काळजी सरकारने कोविडच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन काटेकोरपणे करून घेणे आवश्यक आहे.

तेरेखोल: सरकारने शाळा सुरू करण्याचा घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे. मात्र तो निर्णय मुलांच्या आरोग्याशी खेळणारा नसावा, याची काळजी सरकारने कोविडच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन काटेकोरपणे करून घेणे आवश्यक आहे. मुलांचे यंदाचे शैक्षणिक वर्ष वाया गेलेल्यांत जमा आहे.

शाळा सुरू करण्यापूर्वी शाळा व्यवस्थापन, पालक व शिक्षक यांना विश्वासात घेणे आवश्यक आहे, अशी प्रतिक्रिया हरमल येथील पालक व गोवा सुरक्षा मंचचे मांद्रे गट अध्यक्ष स्वरूप नाईक यांनी व्यक्त केली आहे. आम्ही धोकाही पत्करतो आहोत याचेही आम्ही भान ठेवणे तितकेच गरजेचे आहे.

सरकारने मुलांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रयत्न करू नये. जानेवारीत कोरोनाची स्थिती पाहून निर्णय घेणे योग्य ठरेल, असे मत मांद्रे येथील भगवती सप्तेश्वर उच्च माध्यमिक विद्यालयाचे पालक-शिक्षक संघाध्यक्ष रामचंद्र पालयेकर यांनी व्यक्त केले. 

संबंधित बातम्या