सरकारने परीक्षेला पर्याय शोधावा

digambar kamat
digambar kamat

पणजी,

गोवा सरकारने कोरोनाच्या वातावरणात दहावी व बारावी परीक्षा घेण्याचा निर्णय बदलुन गोवा शालांत मंडळाला शिक्षण व वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञांचा सल्ला घेऊन परीक्षा घेण्या ऐवजी  वेगळा पर्याय काढण्याचे निर्देश द्यावेत अशी मागणी विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत यांनी केली आहे. 

कोविडचा फैलाव रोखण्यासाठी देशव्यापी लाॅकडाऊन जाहिर झाल्यानंतर बारावीचे दोन पेपर तसेच दहावीची संपुर्ण परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. सरकारने आता या परिक्षा २०-२१ मे पासुन घेण्याचे ठरविले आहे, परंतु कोरोनाच्या वातावरणांत विद्यार्थी सदर परीक्षा देण्यास मानसीक दृष्ट्या तयार नसल्याचे अनेक पालक, शिक्षक तसेच समाजसेवी संस्थाच्या प्रतिनीधीनी माझ्या लक्षात आणुन दिले आहे. दहावी परीक्षेसाठी सुमारे अठरा हजार विद्यार्थी बसणार असुन, कोरोनाचे निर्बंध पाळताना, व्यक्तिगत अंतर ठेवणे बंघनकारक असल्याने, एका वर्गात केवळ ८ ते १० विद्यार्थी बसु शकतील अशी व्यवस्था करणे गरजेचे आहे. त्यामुळे सुमारे १८०० वर्गांची गरज भासणार असुन, आजच्या घडीला सरकारकडे एवढी साधन सुविधा उपलब्द नाही हे स्पष्ट आहे. उकाड्याचे दिवस असल्याने वर्गांत पंखे असणे गरजेचे असुन, अतिरीक्त आसन व्यवस्थेसीठी नविन शाळांत परीक्षा घेण्याचे जर सरकारने ठरविले असेल तर त्या शाळांमध्ये स्वच्छतागृहांची सोय आहे का व इतर साधनसुविधा उपलब्द आहे का हे बघणे महत्वाचे आहे, असे त्‍यांनी पत्रकात लिहले आहे

आज दहावी-बारावीचे सुमारे २०० विद्यार्थी गोव्याबाहेर असुन, त्यांना परत येण्यासाठी वाहतुक व्यवस्था नसल्याने त्यांच्या भवितव्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्याना परत आल्यानंतर कोरोंटायन व्हावे लागल्यास परीक्षेला बसणे शक्य होणार नाही. 

कोवीडच्या वातावरणात परीक्षेला मुलांना बोलविणे म्हणजे त्यांच्या जीवाशी खेळण्यासारखेच असुन, परीक्षेच्या दिवसांत प्रत्येक मुलाला सोडण्यासाठी पालक आले तर सगळीकडे गोंधळ व गर्दी वाडेल हे सरकारने लक्षात ठेवावे.

गोवा हेडमास्टर संघटना व बिगर सरकारी संस्था तसेच समाजसेवी संस्थाचे प्रतिनीधी, शिक्षक व विद्यार्थी यांनी परीक्षेच्या ऐवजी वेगळा पर्याय काढण्याची जी मागणी केली आहे ती सरकारने मान्य करावी. शिक्षण व वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञांचा सल्ला घ्यावा, असेही कामत यांनी सुचविले आहे. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com