'सरकारने पाण्याची समस्या सोडवावी'

स्वंयपूर्ण गोवा करण्याची भाषा करीत विधानसभा निवडणुकांना (Assembly elections) सामोरे जाणाच्या तयारीत असलेल्या भाजपा सरकारने सर्वप्रथम गावांगावांतील पाणी समस्या सोडवून दाखवावी.
Women
WomenDainik Gomantak

शिवोली: जोपर्यंत पाणी नाही तोपर्यत मतदान नाही, पाण्याच्या समस्येने त्रस्त बादेंतील महिलांचा  स्वंयपूर्ण गोवा करण्याची  भाषा करीत विधानसभा निवडणुकांना (Assembly elections) सामोरे जाणाच्या तयारीत असलेल्या भाजपा सरकारने सर्वप्रथम गावांगावांतील पाणी समस्या सोडवून दाखवावी. बादें -आंसागांव येथील महिला गेली अनेक वर्षे पाण्यासाठी वणवण करीत आहेत त्यांच्या हालांना पारावार राहिलेला नाही, त्यामुळे जोपर्यंत याभागातील पाण्याची समस्या कायम स्वरूपात सुटणार नाही तोपर्यंत आगामी विधानसभा निवडणुकीवर जाहीर बहिष्कार घालण्याचा एकमुखी निर्णय बादें आंसगावातील (Baden Ansagawa) महिलांनी घेतला.

दरम्यान, मंगळवारी संध्याकाळी मोठ्या संख्येने याभागातील मुख्य रस्त्यावर उतरलेल्या महिलांनी नो वॉटर नो वोट अशा जोरदार घोषणांनी आसमंत दणाणून सोडले. यावेळी त्यांच्या डोक्यावर रिकाम्या कळशा तसेच हाती खाली बादल्या होत्या. दरम्यान, गेल्या सहा महिन्यापासून बादे-आंसगावात पिण्याच्या पाण्याची तीव्र समस्या ग्रांमस्थांना सतावत असून रात्री -बेरात्री किंचीतसा होणारा पाणी पुरवठा महिलांची झोपमोड करण्याबरोबरच शारीरिक आजारांना आमंत्रण देत असल्याचे यावेळी उपस्थित महिलांनी सांगितले. याभागातील पाणी समस्येवरुन आतापर्यंत म्हापसा सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कार्यालयावर अनेकदां मोर्चे काढलेत, स्थानिक आमदार -मंत्र्यांच्या कानावर अनेकदां कैफियत मांडली परंतु आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटक असल्याने याभागातील लोकांचा ना सरकार ना स्थानिक लोकप्रतिनिधी गंभीरपणे विचार करत नसल्याचे सामाजिक कार्यकर्त्या पार्वती नागवेंकर यांनी सांगितले. याभागातील पंचायत सदस्य क्षिरसागर नाईक यांनी आपण या विषयांवरुन गेले वर्षभर संबंधित खात्याशी रितसर पत्रव्यवहार करत असल्याने सांगितले मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून ते संबंधित खात्याच्या मंत्र्यापर्यत आजवर कुणीच आमच्या समस्येकडे पुरेपूर लक्ष दिले नसल्याने पाण्याची समस्या दिवसेंदिवस तीव्र बनत चालल्याचे सांगितले. त्यामुळेच जोपर्यंत याभागातील पाणी पुरवठा सुरळीत केला जाणार नाही तोपर्यंत आगामी विधानसभा निवडणुकीवर सामाजिक बहिष्कार घालण्याचा ग्रांमस्थांनी निर्णय घेतल्याची माहिती नाईक यांनी शेवटी दिली.

Women
गोव्याला तौक्ते वादळाचा मोठा फटका, लाखोंचे झाले नुकसान

दरम्यान, रिकाम्या घागर्या तसेच बादल्या घेऊन रस्त्यावर उतरलेल्या महिलांनी यावेळी आंमका जाय आमकां जाय पिवपाचे उदक आंमका जांय अशा जोरदार घोषणा दिल्या तसेच नो वॉटर, नो वोट असे फलक महिलांनी आपापल्या हाती घेतले होते. गावातील पुरुष मंडळीही मोठ्या प्रमाणात यावेळी महिलांसोबत रस्त्यावर उतरुन सरकारचा निषेध करत होते. यावेळी स्थानिक महिला आश्विनी सावंत, नम्रता नार्वेकर, अंकीता नाईक तसेच जग्गनाथ गांवकर, आणी सारंग यांनी आपल्या समस्या स्थानिक प्रसार माध्यमांसमोर मांडल्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com