सरकारने अनुदानित दरात कांद्याची विक्री करावी

गोमंतक वृत्तसेवा
रविवार, 1 नोव्हेंबर 2020

कांद्याच्या वाढत्या किंमतीमुळे सामान्य लोकांच्या खिशाला कात्री लागलेली असून सरकारने कृषी पणन मंडळाच्या गाड्याना कांदे पुरवून गोमंतकीयाना अनुदानित दरात कांद्याची विक्री करावी, अशी मागणी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा प्रतिमा कुतिन्हो यांनी केली.

सासष्टी:  कांद्याच्या वाढत्या किंमतीमुळे सामान्य लोकांच्या खिशाला कात्री लागलेली असून सरकारने कृषी पणन मंडळाच्या गाड्याना कांदे पुरवून गोमंतकीयाना अनुदानित दरात कांद्याची विक्री करावी, अशी मागणी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा प्रतिमा कुतिन्हो यांनी केली. तर, सरकारने दहा दिवसात यासंबंधी पाऊले न उचलण्यास काँग्रेस महिला प्रदेश गावोगावी जाऊन कांद्याची विक्री करून आंदोलन छेडणार, असा इशाराही त्यांनी केली. 

कांद्याच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने आज (शनिवारी) गोवा काँग्रेस महिला समितीने मडगाव पालिकेसामोरे धरणे आंदोलन पुकारले होते. शेतकऱ्यांच्या भल्यासाठी शेती  विधेयक जारी केले असल्याचा दावा सरकार करीत आहे. हे विधेयक जरी अजून १५ दिवस सुद्धा झालेले नसून कांद्याने शंभरी पार केली आहे. कांद्याच्या वाढत्या किंमतीला विरोध म्हणून आज महिला काँग्रेसने २५ रुपयांत लोकांना कांद्याची विक्री केलेली आहे असे प्रतिमा कुतिन्हो यांनी सांगितले. गरीब, श्रीमंत आदी सर्व प्रकारच्या लोकांना आपल्या रोजच्या जेवणात कांदा लागतो तरी सरकारने महिन्याला फक्त ३ किलो कांदा देणार असल्याचे जाहीर केल्याने त्यांनी संताप व्यक्त
 केला.

सरकारने रेशन कार्ड धारकांना महिन्याला ३ किलो कांदा देण्याचे जाहीर करणे निषेधार्थ असून राज्यात ज्या लोकांकडे रेशन कार्ड नाही त्या लोकांनी काय करावे हे सरकारने स्पष्ट केले पाहिजे. सरकारने फक्त काही लोकांनाच खुश करण्यासाठी सदर पाऊल उचलले आहे का असा सवाल प्रतिमा कुतिन्हो यांनी केला. सरकारने आता तरी स्वतःच्या फायद्याचा  विचार न करता, लोकांच्या हितासाठी अनुदानित दरात लोकांना कांद्याची विक्री करावी, अशी मागणी त्यांनी केली.

संबंधित बातम्या