Covid-19 Third Wave: गोवा सरकार तिसऱ्या लाटेशी सामना करण्यासाठी 10 जूनपर्यंत सज्ज                

Cm of goa.jpg
Cm of goa.jpg

पणजी: कोविडची तिसरी लाट (Covid-19 Third Wave)  आली आणि त्यात बालकांना कोविडची लागण मोठ्या प्रमाणावर झाली, तर त्या परिस्थितीला सामोरे जाण्याची तयारी राज्याने केली आहे. येत्या  10 जूनपर्यंत सुविधा, उपकरणे आणि मनुष्यबळ या तिन्ही पद्धतीने सारी तयारी पूर्ण झालेली असेल अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली. यावेळी त्यांच्यासोबत आरोग्यमंत्री विश्वजित राणे (Vishwajeet Rane) होते. (The government will be ready for the third wave of corona by June 10, the chief minister said)

मुख्यमंत्री म्हणाले, तिसरी लाट कधी येणार आणि तिचा फटका बालकांनाच बसणार हे सांगता येत नाही. मात्र त्याविषयी तज्ज्ञांची मते व्यक्त होत आहेत. दुसरी लाट कधी सुरु झाली, ती आता ओसरली का याविषयी दुमत आहे. मात्र राज्याने सर्व शक्य शक्यता गृहित धरून तयारी सुरु केली आहे. गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात 10 नवजात सर्वंकष काळजी कक्ष सुरु केले जाणार आहेत. असेच पाच कक्ष म्हापसा येथील सरकारी जिल्हा इस्पितळात सुरु केले जातील. गोमेकॉत बालकांवरील उपचारासाठी 60 खाटांचा एक वेगळा वार्ड सुरु केला जाणार आहे. 30 खाटांचा एक वार्ड असे दोन वार्ड अतिविशिष्ट उपचार विभागाच्या नव्या इमारतीत असतील. सध्या अस्तित्वात असलेल्या अतिदक्षता विभागापैकी 20 टक्के विभागांचे रुपांतर बालकांवरील उपचारासाठी करता येणार आहे. 

सरकारने सुविधा, उपकरणे, औषधे व मनुष्यबळ यांच्यावर भर दिला आहे. 120 बाल रोग तज्ज्ञ राज्यात आहेत. त्यांचीही सेवा सरकारसाठी घेतली जाणार आहे. त्यांच्याशी चर्चा सुरु आहे. सध्याची कोविड इस्पितळे ही बालकांवरील उपचारासाठी रूपांतर करण्यासाठीची तयारी ठेवण्यात आली आहे.समुपदेशकांना प्रशिक्षण दिले जात आहे. बालकांपासून रोगाचा संसर्ग पसरू नये यासाठी गृह अलगीकरणासाठी नियमावली तयार केली जात आहे, असेही ते म्हणाले आहेत.

गोमेकॉतील अतिविशिष्ट उपचार विभागाच्या नव्या इमारतीत रुग्णांवर उपचार करणे सुरु केले आहे. 550 खाटांपैकी 284 खाटांवर सध्या रुग्ण आहेत. 1000 खाटा रिक्त आहेत. गोमेकॉच्या जुन्या इमारतीतून शक्य त्या रुग्णांना नव्या इमारतीत हलवण्यात येत आहे. याही इमारतीची रचना कोविडची तिसरी लाट आली आणि त्यात बालके रुग्ण झाली तर त्यांच्या उपचारास योग्य अशी बदलता येणार आहे. साडेतीन लाख जण 17 वर्षांखालील आहेत  त्यापैकी 16 हजार 246 जणांना कोविडची लागण झाली आहे. हे प्रमाण एकूण रुग्णसंख्येच्या ११ टक्के आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेपूर्वीच कमी वयाच्या सर्वाना कोविडची लागण होणे सुरु झाले आहे. 18 वर्षांखालील 7  जणांचा मृत्यू कोविडने झाला आहे. 

काळी बुरशी हा संसर्गजन्य आजार नाही. मात्र तो रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना केली जात आहे. त्यावरील उपचारासाठी खास वार्ड आरक्षित ठेवला असून त्यात नेत्रचिकित्सक, घसा तज्ज्ञ, कानविकार तज्ज्ञ, सर्वसाधारण उपचार करणारे असे सर्व विद्याशाखांचे डॉक्टर्स तेथे उपचार करत आहेत. अशी रुग्णांना एम्ससारख्या ठिकाणी देण्यात येणारे उपचार येथेही देता यावेत असे सरकारचे प्रयत्न आहेत.

आरोग्यमंत्री म्हणाले, मुलांना कोविडपासून वाचवण्यासाठी आणि कोविडचीलागण झाल्यानंतर उत्तमोत्तम उपचार करण्यासाठी साऱ्या सुविधांची निर्मिती केली आहे. पालकांसमवेत चाचणीसाठी आलेल्या बालकांला कोविडची लागण झाल्यानंतर त्याच्यावर यशस्वी उपचार डॉक्टरांनी केले आहेत.कोविड हा रोग समान असला तरी बालकांवरील उपचारांत थोडे वेगळेपण असते. ते वेगळेपण समजून घेऊन उपचार करावे लागतात. कोणत्याही परिस्थितीस सामोरे जाण्याची तयारी आता आरोग्य खात्याने केली 
आहे.                                                                                              पंचायतींनी लसीकरणासाठी पुढाकार घ्यावा
राज्यातील एकाही पंचायत क्षेत्रात 45 वर्षांवरील सर्वांनी लस घेतली असे झालेले नाही. काणकोणचे आरोग्याधिकारी व उपजिल्हाधिकाऱ्यांनी चांगले काम केले आहे. त्यामुळे काणकोणात  या वयोगटातील 70 टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे. पंचायतींनी लसीकरणासाठी पुढाकार घेणे   आवश्यक आहे. आजही 45 वर्षांवरील वयोगटासाठी 2  लाख 80 हजार लसी राज्यात उपलब्ध आहेत. १८ ते ४५ वयोगटासाठी आलेल्या लसी संपल्या असून जूनच्या पहिल्या आठवड्यात ३६  हजार लसी मिळणार आहेत. 45 वर्षे वयोगटावरील शिल्लक लसी 18 ते 45 वयोगटासाठी वापरण्यासाठी केंद्र सरकारकडे परवानगी मागितली आहे. एका कंपनीकडून 10 लाख तर दुसऱ्या कंपनीकडून 5  लाख लसी घेण्याची तयारी आहे. आता होमआयशोलेशन कीटमध्ये आयुष मंत्रालयाच्या शिफारशीनुसार आयुष 64 या गोळ्या समाविष्ट केल्या आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com