महिला संघाच्या माध्यमातून महिला सशक्तीकरणाची संधी

गोमंतक वृत्तसेवा
शनिवार, 7 नोव्हेंबर 2020

अनेक महिला गट मिळून एकत्रित एक मोठा गट स्थापन केला. तर महिलांना व्यवसायासाठी वाव मिळणार आहे, अशा महिला संघाच्या माध्यमातून महिला सशक्तीकरणाची फार मोठी संधी लाभल्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी वाळपईत बोलताना सांगितले.

स्वंयसहाय्य गटाद्वारे महिलांनी स्वावलंबी व्हावे

वाळपई : वाळपई नगरपालिकेला नगरसेवकांचे चांगले मंडळ लाभले. प्रत्येक नगसेवकाने आपापल्या परीने चांगले काम केले आहे. सरकारतर्फे महिला वर्गाच्या विकासासाठी विविध योजना स्वयं साहाय्य गटाच्या माध्यमातून राबवीत आहेत. स्वयं साहाय्य गटाच्याद्वारे महिलांनी स्वावलंबी होण्यासाठी नेहमीच तत्पर राहिले पाहिजे. तरच गटस्थापनेचा सरकारचा उद्देश यशस्वी होणार आहे. अनेक महिला गट मिळून एकत्रित एक मोठा गट स्थापन केला. तर महिलांना व्यवसायासाठी वाव मिळणार आहे, अशा महिला संघाच्या माध्यमातून महिला सशक्तीकरणाची फार मोठी संधी लाभल्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी वाळपईत बोलताना सांगितले.

यावेळी कोविड योद्धा वाळपई सरकारी आरोग्य केंद्राचे आरोग्याधिकारी डॉ. श्याम काणकोणकर, डॉ. अभिजीत वाडकर,  अकीब शेख, डॉ. विदेश जल्मी यांचा राणेंच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी मान्यवरांना सेनिटायझर भेटवस्तू म्हणून प्रदान करण्यात आली.

राणे पालिकेच्या प्रभाग सात क्षेत्रात स्थापन केलेल्या एरिया लेवल फेडरेशन ऑफ सेल्फ हेल्प ग्रुपच्या उद्‍घाटन सोहळ्यात बुधवारी सायंकाळी बोलत होते. वाळपई पालिकेच्या सभामंडपात आयोजित सोहळ्याला नगराध्यक्ष अख्तर शहा, उपनगराध्यक्ष परवीन खान, मुख्याधिकारी दशरथ गावस, उपजिल्हाधिकारी राजेश आजगावकर, नगरसेवक रामदास शिरोडकर, सय्यद सरफराज, परवीन शेख, शहजीन शेख, अंजली च्यारी, अनिल काटकर, अतुल दातये, आरोग्यधिकारी डॉ.श्याम काणकोणकर, ग्रुपच्या पदाधिकारी रहिमा खान यांची उपस्थिती होती.

श्री. राणे पुढे म्हणाले,  गेले  काही महिने कोरोनामुळे कठीण गेले. पुढेही सतर्कता बाळगणे गरजेचे आहे. सत्तरीत काही गावात कोरोनाची लागण झाली. त्यामुळे ग्रामस्थांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले.
यापुढेही ग्रामस्थांनी सावध राहून मास्क घालावेच. आपण केलेल्या प्रयत्नांमुळे वनखात्यातर्फे कुमठळ ते काजरेधाट, व वाळपईतील सय्यद नगरातील रस्त्याला मंजुरी मिळाली आहे. त्याकरिता बारा वर्षे याकामी लागलो होती.  एरिया लेवल ग्रुपच्या माध्यमातून, महिलांनी एकत्र येऊन स्वावलंबन व्हावे. सरकारनेहमीच त्याकरिता कटिबद्ध राहणार आहे. महिलांनी स्वावलंबी योजनेचा लाभ घ्यावा,असे  अनेक ग्रुप एकत्र आले,तर फायदा होणारा आहे. 

स्वयं सेवा गटांनी मास्क केले, तर रोजगार मिळणार आहे. महिलांनी विविध उपक्रम राबवावेत, मास्क तयार करून वापरावेत. वाळपई मतदार संघ सुधारण्यासाठी लोकांचे सहकार्य हवे आहे. गटांच्या माध्यमातून विविध उत्पन्न कसे करता येईल, त्यानुसार महिलांनी कार्यरत रहावे, मार्केट कसे करावे गावात काय करू शकतो. त्यानुसार कार्यवाही ग्रुपनी ला पाहिजे. विविध व्यवसाय करण्यास प्राधान्य द्यावे. अख्तर शहा म्हणाले, वाळपई मतदार संघाला चांगला आमदार लाभलेला आहे. त्यातून मतदार संघात विकासपर्व मार्गी लागले आहे. सय्यद सरफराज यांनी विचार मांडले. सूत्रनिवेदन जमिला शेख यांनी केले. तर शबनम शेख यांनी आभार मानले.

संबंधित बातम्या