सिरमच्या आदर पूनावाला यांचा केंद्राला प्रश्न; कोरोनाच्या लसीकरणासाठी ८० हजार कोटी मिळतील?

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 27 सप्टेंबर 2020

कोरोनाच्या लसीकरणासाठी केंद्र सरकारकडे वर्षभरात ८० हजार कोटी उपलब्ध होतील का, असा थेट प्रश्‍न सिरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पूनावाला यांनी ट्विटरद्वारे विचारला आहे. त्यात त्यांनी केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि प्रधानमंत्री कार्यालयाला टॅग केले आहे. 

पुणे: कोरोनाच्या लसीकरणासाठी केंद्र सरकारकडे वर्षभरात ८० हजार कोटी उपलब्ध होतील का, असा थेट प्रश्‍न सिरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पूनावाला यांनी ट्विटरद्वारे विचारला आहे. त्यात त्यांनी केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि प्रधानमंत्री कार्यालयाला टॅग केले आहे. 

लस कधी उपलब्ध होणार, मोफत मिळणार की पैसे द्यावे लागणार, तिची किंमत नक्की किती असेल, असे अनेक प्रश्न सध्या उपस्थित होत आहेत. देशात कोरोनाची लस सरकारकडून देण्यात येईल, असे यापूर्वीच जाहीर करण्यात आले आहे. मात्र, सरकारला या लसीकरणासाठी किती खर्च येईल? असा प्रश्नदेखील उपस्थित होत आहे. ऑक्‍सफर्ड विद्यापीठाच्या कोविशिल्ड लसीच्या भारतासह जगभरात चाचण्या सुरू आहेत. पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट या औषध निर्माण संस्थेशी ऑक्‍सफर्डचा करार झाल्यामुळे सिरममध्ये या लसीचे उत्पादन होत आहे. लस माफक दरात उपलब्ध होईल, लस सरकारच्यावतीने देण्यात येईल, भारतीयांना लस देण्यात प्राधान्य दिले जाईल, असं यापूर्वीच पूनावाला यांनी स्पष्ट केले आहे.  पूनावाला यांनी ट्विटमध्ये म्हटलंय की, केंद्रीय आरोग्यमंत्रालयाकडे पुढील वर्षभरासाठी ८० हजार कोटी रुपये आहेत का? कारण देशाच्या कानाकोपऱ्यात कोरोना लस पोचवण्यासाठी इतके पैसे लागणार आहेत. 

संबंधित बातम्या