राज्यपाल भगतसिंह कोश्यारी शपथबद्ध

अवित बगळे
बुधवार, 19 ऑगस्ट 2020

नव्या राज्यपालांनी कोकणीत शपथ घेतली.

पणजी

गोव्याचे राज्यपाल म्हणून भगतसिंह कोश्यारी यांनी राजभवनाच्या दरबार सभागृहात आज शपथ घेतली. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दिपांकर दत्ता यांनी त्यांना शपथ दिली. कोश्यारी हे महाराष्ट्राचेही राज्यपाल आहेत.

कोश्यारी याचे दाबोळी विमानतळावर आगमन झाल्यावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी त्यांचे स्वागत केले. राजभवनावर पोलिसांनी त्यांना सलामी दिली. नंतर एका साध्या समारंभात त्यांना पदाची शपथ देण्यात आली.

गोव्याचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची मेघालय यांची बदली झाल्याने ते गोव्यातून आज रवाना झाले. त्यांना विमानतळावर मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्यासह विधानसभेचे सभापती राजेश पाटणेकर, विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, राजशिष्टाचारमंत्री माविन गुदिन्हो आदींनी निरोप दिला.

कोश्यारी यांच्याकडे गोव्याच्या राज्यपालपदाचा अतिरीक्त ताबा देण्यात आला आहे. राजभवनावर आज झालेल्या शपथविधी सोहळ्यास उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर, खासदार विनय तेंडुलकर आदी उपस्थित होते. नव्या राज्यपालांनी कोकणीत शपथ घेतली.

कोश्यारी हे सप्टेंबर २०१९ पासून महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत. १९९७ मध्ये ते उत्तर प्रदेशच्या विधान परिषदेचे सदस्य बनले नंतर उत्तराखंड राज्याची निर्मिती झाल्यानंतर ते उत्तराखंडचे ऊर्जामंत्री होते. २०१-०२ या कार्यकाळात ते उत्तराखंडचे मुख्यमंत्रीही होते. नोव्हेंबर २००८ मध्ये ते राज्यसभा सदस्य झाले. त्या पदावर ते २०१४ पर्यंत होते.

संबंधित बातम्या